Chia Crop : चिया पिकाचे उगमस्थान कुठे आहे आणि ते भारतात कसे आले याविषयीची सविस्तर माहितीआज आपण वाचणार आहोत.
ऑस्ट्रेलियन जर्नल ऑफ क्रॉप सायन्स, ऑक्टोबर २०१८ रोजी यांनी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, सुमारे ४,५०० वर्षांपूर्वी मेसो अमेरिकेत चिया उत्पादित केले जात होता आणि त्याचा वापर अन्न आणि औषध म्हणून केला जात असे. मात्र, केवळ तीन शतकांत हे पीक विस्मृतीत गेले आणि बऱ्याच वर्षांपासून अज्ञात पीक राहिले. (Chia Crop)
अलिकडच्या काही वर्षांत, चिया बियावर संशोधन झाले व चियाच्या उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्यांमुळे त्याची प्रचंड मागणी वाढली आहे. मध्य अमेरिकेतून केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था (Central Food Technological Research Institute), म्हैसूर यांनी २०१२ मध्ये चिया भारतात आणले आणि त्यावर संशोधनास सुरुवात झाली.(Chia Crop)
सुरुवातीला म्हैसूर जवळील काही भागात शेतकऱ्यांनी याची लागवड केली. सध्या ही लागवड कर्नाटकातील इतर भागात आणि शेजारच्या राज्यांमध्येही पसरली आहे. निरोगी आणि पौष्टिक अन्नाच्या वाढत्या मागणीमुळे मागील काही वर्षांत महाराष्ट्रात चिया लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.(Chia Crop)
चिया या पिकाकडे नवीन पीक म्हणून पाहिले जात आहे. परंतु, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चिया बियाण्याचे व चिया तेलाचे आर्थिक मूल्य अधिक आहे.
साल्व्हिया हिस्पॅनिका एल. हे चियाचे शास्त्रीय नाव आहे. हे प्रामुख्याने त्याच्या बियाण्यांसाठी पिकविली जाते. हे लॅमियासी कुटूंबातील पिक आहे. चिया ही एक औषधी वनस्पती आहे, जिचे उगमस्थान दक्षिण मेक्सिको आणि उत्तर ग्वाटेमाला आहे.(Chia Crop)
आकार कसा असतो?
या वनस्पतीमध्ये जांभळी व पांढरी फुले येतात जी तीन-चार मिलीमीटर लहान स्वरूपाची असतात. चिया बियाण्यांचा एक लहान, अंडाकृती आकार असतो, ज्याचा व्यास सुमारे एक ते दोन मिलीमीटर असतो.
आरोग्यदायी अश्या या पिकाची भुरळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पडली आहे. शेतकऱ्यांचा कल आता या पिकाकडे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.