Chia Crop : चिया पिक निवडण्याचे अनेक कारणे आहेत. चिया हे कमी पाण्यात आणि कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक आहे. तसेच, ते आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे आणि बाजारात त्याची मागणी चांगली आहे. (Chia Crop)
चिया पिक निवडण्याची काय आहेत कारणं?
* कमी पाणी आणि खर्च : चिया पिकाला सिंचनाची फारशी गरज नसते, त्यामुळे पाणी बचत होते. तसेच, ते कमी खर्चात लावता येते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो.
* उत्पादन : चिया पीक कमी जागेत चांगले उत्पादन देऊ शकते, काही ठिकाणी एका एकरात ५००-६०० किलो बियाणे उत्पादन मिळवता येते, तर योग्य व्यवस्थापनात २ हजार ५०० किलो प्रति एकर उत्पादन देखील मिळू शकते.
* आरोग्यदायी : चिया बियाणे हे पौष्टिक आणि आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. त्यामुळे बाजारात त्याला चांगलीच मागणी आहे.
* सेंद्रिय शेती : चिया बियाणे लागवड सेंद्रिय पद्धतीने करता येते, त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो आणि पर्यावरणाला मदत होते.
* रोग-किडी नाही : चिया पीक रोग आणि किडीसाठी जास्त संवेदनशील नसते, त्यामुळे त्यावर विशेष लक्ष देण्याची गरज नसते.
* जनावरांचा धोका नाही : या वनस्पतीला जनावरं खात नाही. त्यामुळे उत्पादनात घट येण्याचा धोका कमी होतो. पिकाची राखण करण्याची गरज नाही.
* नैसर्गिक आणि सोयीचे : चिया बियाणे नैसर्गिकरित्या वाढत असल्याने, त्याची लागवड करणे सोपे आहे.
* उत्पादनाला चांगली किंमत : चिया बियाणे बाजारात सुपरफूड म्हणून प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्याला चांगला भाव मिळतो.
चिया हे आता रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या पसंतीस हे पिक उतरले आहे. शिवाय या पिकास अपेक्षित भावही मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या पिकाकडे कल वाढत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Chia Crop: चिया पिकाचे उगमस्थान काय आहे? जाणून घ्या सविस्तर