CIBIL सिबिलचा फूल फॉर्म हा क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड आहे. ही एक क्रेडिट माहिती कंपनी आहे जी वेळोवेळी व्यक्ती आणि कंपन्यांचा आर्थिक डाटा संकलित करून त्याचे रेकॉर्ड ठेवते.
तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असल्यास बँका आणि वित्तीय संस्था आधी तुमचा सिबिल स्कोअर तपासून घेतात. स्कोअर कमी असेल, तर कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. प्रसंगी कर्ज नाकारलेही जाऊ शकते.
वित्तीय क्षेत्रात नोकरी करण्यासाठीही आता सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. कारण अनेक कंपन्या उमेदवाराचा सिबिल स्कोअर तपासतात. आपला सिबिल स्कोअर चांगला कसा ठेवावा, याची माहिती घेऊ या.
सिबिल बद्दल ठळक मुद्दे
- सिबिल स्कोअर हा ३०० ते ९००च्या आतील आकडा असतो.
- सिबिलच्या रिपोर्टमध्ये एखाद्याची संपूर्ण आर्थिक कुंडलीच असते.
- तुमच्या आर्थिक व्यवहाराचा संपूर्ण इतिहास त्यात असतो.
- किमान एकदा कर्ज घेणे आवश्यक.
- १८ ते ३६ महिन्यांत सिबिल स्कोअर तयार होतो.
काय सांगतो सिबिल स्कोर?
३०० ते ३५० आर्थिक पत कमजोर
५५० ते ६५० सरासरी
६५० ते ७५० उत्तम
७५० ते ९०० सर्वोत्तम
सिबिल स्कोर ६५०च्या वर असल्यास बँका कर्ज देण्यास तयार होतात.
सिबिल म्हणजे काय?
सिबिल हे क्रेडीट इंफॉर्मेशन ब्यूरो इंडिया लिमिटेडचे लघुरूप आहे. हि रिजर्व्ह बँकेला माहिती देणाऱ्या कंपन्यापैकी एक कंपनी आहे. याशिवाय भारतात विक्स एक्सपेरियन आणि सीएफआय हायमार्क या कंपन्याही क्रेडिटबाबत माहिती देतात.
सिबिल स्कोअर खराब होऊ नये म्हणून काय कराल?
१) वेळेत भरा ईएमआय.
२) क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घ्या.
३) झेपेल तेवढेच कर्ज घ्या.
४) वारंवार सिबिल स्कोअर तपासू नका.
५) सामाईक खात्यापासून (Joint Account) राहा सावध.
अधिक वाचा: Vij Bill Savlat : वीजबिलात सवलत हवी असेल तर हे करा मिळेल इतकी सूट