सलग समतल चर हा मृद व जलसंधारणाचा एक प्रभावी उपचार राबविला जातो. यामध्ये अतिउताराच्या पडीक क्षेत्रावर समपातळी चर खोदून वृक्ष लागवड केली जाते.
सीसीटी का खोदावेत?
- डोंगर माथ्यावर वेगाने वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याची गती कमी करणे.
- जमीनीची धूप कमी करणे.
- वाहत येणारे पाणी चरामुळे व गवत अगर झाडांमुळे अडून राहून जमिनीमध्ये पाणी मुरण्यास मदत होते.
- पडीक जमिन उत्पादनक्षम बनून काही प्रमाणात हे क्षेत्र लागवडीखाली आणले जाते.
- उपचार योग्य पडीक सिमांतिक जमिनीचा विकास प्रभावीपणे वेगाने केला जातो.
जागा निवड कशी करावी?
१) शेतीस अयोग्य असलेले क्षेत्र.
२) डोंगर उतारावरील पडीक जमिनी.
३) पाणलोटाच्या वरील, मधील आणि खालील भागातील पडीक जमीन.
४) पडीक जमिनीवर साधारणतः ३ ते ४ इंचापर्यंत मातीचा थर असावा.
५) पडीक क्षेत्रातील खातेदारांची उपचार घेण्यासाठी संमती आवश्यक आहे.
६) सलग समतल चर घेण्यासाठी क्षेत्राचा जास्तीत जास्त उतार १५% पर्यंत असणे आवश्यक आहे.
सलग समतल चर मॉडेल
अ) ०.३० मी. खोली (मॉडेल ५-७)
चराची रुंदी-०.६० मी.
चराची खोली -०.३० मी.
पाणी साठा - १८० घ.मी./हेक्टर
ब) ०.४५ मी. खोली (मॉडेल ५-७)
चराची रुंदी-०.६० मी.
चराची खोली-०.४५ मी.
पाणी साठा - २७० घ.मी./हेक्टर
सीसीटीसाठी महत्वाचे
- सलग समतल चर खोदून उताराच्या बाजूस मातीचा बांध/भराव घालावा.
- चराचे काम मंजूर मॅडेलप्रमाणे चराची लांबी व मधील गॅप सोडून करावे.
- दोन चरामधील सोडलेली गॅप एकाखाली एक येणार नाही हे पाहून स्टॅगर्ड पद्धतीने खोदावेत.
- मातीच्या भरावावर स्थानिक झाडे झुडपांचे व गवताचे बियाणे पावसाळ्याच्या सुरुवातीस पुरेसा ओलावा पाहून पेरण्यात यावे.
अधिक वाचा: Panlot Kshetra : पाणलोट क्षेत्र म्हणजे नक्की काय? आणि त्याचे प्रकार कोणते? वाचा सविस्तर