Lokmat Agro >स्मार्ट शेती > लिंबूवर्गीय फळपिकांवरील रोग प्रसारक सिट्रस सायला किडीचे असे करा नियंत्रण

लिंबूवर्गीय फळपिकांवरील रोग प्रसारक सिट्रस सायला किडीचे असे करा नियंत्रण

Control of disease vector Citrus psylla pest on citrus fruit crops | लिंबूवर्गीय फळपिकांवरील रोग प्रसारक सिट्रस सायला किडीचे असे करा नियंत्रण

लिंबूवर्गीय फळपिकांवरील रोग प्रसारक सिट्रस सायला किडीचे असे करा नियंत्रण

सद्यस्थितीत आंबिया बहारातील लिंबूवर्गीय फळपिकांना नवीन पालवी फुटत आहे. या नवतीवर पानांचा रस शोषणाऱ्या किडी सक्रिय झाल्या आहेत.

सद्यस्थितीत आंबिया बहारातील लिंबूवर्गीय फळपिकांना नवीन पालवी फुटत आहे. या नवतीवर पानांचा रस शोषणाऱ्या किडी सक्रिय झाल्या आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

सद्यस्थितीत आंबिया बहारातील लिंबूवर्गीय फळपिकांना नवीन पालवी फुटत आहे. या नवतीवर पानांचा रस citrus psylla शोषणाऱ्या किडी सक्रिय झाल्या आहेत.

सिट्रस सायला ही रस शोषणारी किड रोग प्रसारास सुद्धा कारणीभूत असते. त्यामुळे होणारे फळपिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी योग्य वेळी खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे फायद्याचे ठरेल.

किडीची नुकसान करण्याची पद्धत
- किडीची पिल्ले व प्रौढ कोवळे शेंडे, पाने आणि कळ्यांमधील रस शोषुन घेतात त्यामुळे पाने मुरडली जातात, गळतात व शेंडे सुद्धा वाळतात.
- पिल्ले मधासारखा चिकट, गोड, पांढरा पदार्थ स्त्रावित करतात ज्यावर काळी बुरशी झपाट्याने वाढते.
- या बुरशीचा थर पानांवर व फांदीवर दिसुन येतो त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते.
- प्रादुर्भाव जास्त आढळल्यास फळधारणेवर सुद्धा परीणाम होतो. सायला किडीमुळे 'ग्रीनींग' जिवाणूचा प्रसार होतो त्यामुळे शेंडेमर रोग झपाट्याने वाढतो.

आर्थिक नुकसानीची पातळी
१० से. मी. शेंड्यावर ६-१० सायला कीड.

व्यवस्थापन कसे कराल?
१) प्रतिबंधात्मक उपाय
-
किडग्रस्त व वाळलेल्या फांदया काढुन टाकाव्यात आणि झाडाचा घेर प्रमाणात ठेवावा ज्यामुळे भरपुर सुर्यप्रकाश जमिनीवर पोहचू शकेल.
- संत्राबागेत किंवा आजुबाजुला गोड लिंबाची झाडे नसावीत कारण हि झाडे सायला किडीचे खाद्य असुन प्रजननाचे फार मोठे स्त्रोत ठरू शकते.
- खताचा व पाण्याचा वापर नियंत्रीत ठेवावा ज्यामुळे झाडांना येणारी नवीन पालवी नियंत्रणात ठेवता येईल.

२) जैविक उपाय
नवतीच्या हंगामात पेट्रोलियम स्प्रे ऑईल (मॅक ऑल सीझन हॉर्टीकल्चरल मिनरल ऑईल) २ टक्के (२० मिली प्रती लिटर) किंवा नीम तेल १ टक्का (१० मिली प्रती लिटर) किंवा नीम सोप किंवा पोंगामिया (करंज) सोप ५ ग्रॅम प्रती लिटर पानकळ्या उमलण्याच्या वेळी किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसताच फवारणी करावी.

३) रासायनिक उपाय
किडीचा प्रादुर्भाव लक्षात येताच थायमेथोक्झाम (२५ डब्लू जी) ०.३ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ एस.एल.) ०.५ मिली. किंवा डायमिथोएट (३० ई.सी.) २.० मि.ली. किंवा सायनट्रानीलीप्रोल* (१०.२६% ओडी) ०.६ मिली प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी.
(*लेबल क्लेम नसलेले परंतु संशोधनाच्या आधारावर प्रभावी आढळुन आलेले किटकनाशक)

- केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था
नागपूर

Web Title: Control of disease vector Citrus psylla pest on citrus fruit crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.