Lokmat Agro >स्मार्ट शेती > उसावरील किडींचा रासायनिक आणि जैविक पद्धतीने असा करा बंदोबस्त

उसावरील किडींचा रासायनिक आणि जैविक पद्धतीने असा करा बंदोबस्त

Control sugarcane pests by chemical and biological methods | उसावरील किडींचा रासायनिक आणि जैविक पद्धतीने असा करा बंदोबस्त

उसावरील किडींचा रासायनिक आणि जैविक पद्धतीने असा करा बंदोबस्त

उसावर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो, यामध्ये खोड कीड, कांडी कीड, शेंडे किड, हुमणी, पांढरा लोकरी मावा आणि पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो.

उसावर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो, यामध्ये खोड कीड, कांडी कीड, शेंडे किड, हुमणी, पांढरा लोकरी मावा आणि पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो.

शेअर :

Join us
Join usNext

उसावर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो, यामध्ये खोड कीड, कांडी कीड, शेंडे किड, हुमणी, पांढरा लोकरी मावा आणि पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो.

बिज/कांडे प्रक्रिया
बुरशीजन्य रोग व खवले किडींचा बंदोबस्त करण्यासाठी बेणे लागणीपूर्वी १० लिटर पाण्यात, डायमेथोएट ३० टक्के, प्रवाही २६.५ मि.ली., १० ग्रॅम कार्बेन्डॅझिमची, १० मिनीटांसाठी बेणे प्रक्रिया करावी.

ऊस पिकातील कीड नियंत्रणासाठी रासायनिक उपाययोजना
खोड कीड

खोड किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरांट्रीनिलीप्रोल ०.४ टक्के दाणेदार १८.७५ किलो प्रति हेक्टरी सरीमध्ये चळीतून मिसळावे. अथवा फिप्रोनिल ०.३ टक्के दाणेदार २५ किलो प्रति हेक्टरी सरींमध्ये चळीतून मिसळावे किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही २५ मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारावे किंवा क्लोरांट्रीनिलीप्रोल १८.५ एस. सी. ४ मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारणी करावी.

कांडी कीड, शेंडे कीड
कांडी कीड शेंडे कीड नियंत्रणासाठी क्लोरांट्रीनिलीप्रोल ०.४ टक्के दाणेदार १८.७५ किलो प्रति हेक्टरी सरींमध्ये चळीतून मिसळावे किंवा फिप्रोनिल ०.३ टक्के दाणेदार २५ किलो प्रति हेक्टरी सरींमध्ये चळीतून मिसळावे.

मूळ पोखरणारी अळी
मूळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही २५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आळवणी द्यावी किंवा फिप्रोनिल ०.३ टक्के दाणेदार २५ किलो प्रति हेक्टर सरीमध्ये चळीतून मिसळून द्यावे.

हुमणी
हुमणीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल ४० टक्के इमिडाक्लोप्रिड ४० टक्के ५०० ग्रॅम प्रति हजार लिटर पाण्यातून आळवणी करावी.

लष्करी अळी
लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरांट्रीनिलीप्रोल १८.५ एम. सी. ४ मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारावे. किंवा एमामेकठिन बेन्झोएट टक्के एस. जी. ४ मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारावे किंवा थायामेथाक्झीम १२.६ टक्के लेमडा सायहॅलोथ्रीन ९.३ टक्के झेड. सी. २.५ मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारावे.

अधिक वाचा: खोडवा ऊस उत्पादन वाढीसाठी पाचट व्यवस्थापन कसे कराल?

ऊस पिकातील कीड नियंत्रणासाठी जैविक उपाययोजना
खोड कोड

खोड कीड नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस (ट्रायकोकार्ड) ५ ते ६ ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरी २५ दिवसाच्या अंतराने लावावेत, ५ कामगंध सापळे (इ.एस.बी. ल्यूर) प्रति हेक्टरी लावावेत.

कांडी कीड
कांडी फीड नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस (ट्रायकोकार्ड) जुलै ते ऑक्टोबर महिन्यात ५ ते ६ ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरी १५ दिवसाच्या अंतराने लावावेत. ५ कामगंध सापळे (आय. एन. बी. ल्यूर) प्रति हेक्टर लावावेत.

लोकरी मावा
लोकरी मावा नियंत्रणासाठी डिफा अफिडीव्होरा १००० अळी प्रति हेक्टर किंवा मायक्रोमस २५०० अळी प्रति हेक्टर १५ दिवसांच्या अंतराने ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यामध्ये उसामध्ये सोडावेत.

पांढरी माशी
पांढरी माशी नियंत्रणासाठी लिकॅनीसिलीयम (व्हर्टिसिलीअम) लेकॅनी (फुले बगीसाइड) ५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

हुमणी
हुमणी नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनीसोप्ली किंवा बिव्हेरिया बेसियाना (फुले बिव्हेरिया) २० किलो प्रति हेक्टरी जमिनीत द्यावे.

लष्करी अळी
लष्करी अळी नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी

डॉ. पी. जी. पाटील
कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

Web Title: Control sugarcane pests by chemical and biological methods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.