उसावर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो, यामध्ये खोड कीड, कांडी कीड, शेंडे किड, हुमणी, पांढरा लोकरी मावा आणि पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो.
बिज/कांडे प्रक्रियाबुरशीजन्य रोग व खवले किडींचा बंदोबस्त करण्यासाठी बेणे लागणीपूर्वी १० लिटर पाण्यात, डायमेथोएट ३० टक्के, प्रवाही २६.५ मि.ली., १० ग्रॅम कार्बेन्डॅझिमची, १० मिनीटांसाठी बेणे प्रक्रिया करावी.
ऊस पिकातील कीड नियंत्रणासाठी रासायनिक उपाययोजनाखोड कीडखोड किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरांट्रीनिलीप्रोल ०.४ टक्के दाणेदार १८.७५ किलो प्रति हेक्टरी सरीमध्ये चळीतून मिसळावे. अथवा फिप्रोनिल ०.३ टक्के दाणेदार २५ किलो प्रति हेक्टरी सरींमध्ये चळीतून मिसळावे किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही २५ मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारावे किंवा क्लोरांट्रीनिलीप्रोल १८.५ एस. सी. ४ मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारणी करावी.
कांडी कीड, शेंडे कीडकांडी कीड शेंडे कीड नियंत्रणासाठी क्लोरांट्रीनिलीप्रोल ०.४ टक्के दाणेदार १८.७५ किलो प्रति हेक्टरी सरींमध्ये चळीतून मिसळावे किंवा फिप्रोनिल ०.३ टक्के दाणेदार २५ किलो प्रति हेक्टरी सरींमध्ये चळीतून मिसळावे.
मूळ पोखरणारी अळीमूळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही २५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आळवणी द्यावी किंवा फिप्रोनिल ०.३ टक्के दाणेदार २५ किलो प्रति हेक्टर सरीमध्ये चळीतून मिसळून द्यावे.
हुमणीहुमणीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल ४० टक्के इमिडाक्लोप्रिड ४० टक्के ५०० ग्रॅम प्रति हजार लिटर पाण्यातून आळवणी करावी.
लष्करी अळी लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरांट्रीनिलीप्रोल १८.५ एम. सी. ४ मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारावे. किंवा एमामेकठिन बेन्झोएट टक्के एस. जी. ४ मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारावे किंवा थायामेथाक्झीम १२.६ टक्के लेमडा सायहॅलोथ्रीन ९.३ टक्के झेड. सी. २.५ मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकावर फवारावे.
अधिक वाचा: खोडवा ऊस उत्पादन वाढीसाठी पाचट व्यवस्थापन कसे कराल?
ऊस पिकातील कीड नियंत्रणासाठी जैविक उपाययोजनाखोड कोडखोड कीड नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस (ट्रायकोकार्ड) ५ ते ६ ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरी २५ दिवसाच्या अंतराने लावावेत, ५ कामगंध सापळे (इ.एस.बी. ल्यूर) प्रति हेक्टरी लावावेत.
कांडी कीडकांडी फीड नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस (ट्रायकोकार्ड) जुलै ते ऑक्टोबर महिन्यात ५ ते ६ ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरी १५ दिवसाच्या अंतराने लावावेत. ५ कामगंध सापळे (आय. एन. बी. ल्यूर) प्रति हेक्टर लावावेत.
लोकरी मावालोकरी मावा नियंत्रणासाठी डिफा अफिडीव्होरा १००० अळी प्रति हेक्टर किंवा मायक्रोमस २५०० अळी प्रति हेक्टर १५ दिवसांच्या अंतराने ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यामध्ये उसामध्ये सोडावेत.
पांढरी माशीपांढरी माशी नियंत्रणासाठी लिकॅनीसिलीयम (व्हर्टिसिलीअम) लेकॅनी (फुले बगीसाइड) ५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
हुमणीहुमणी नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनीसोप्ली किंवा बिव्हेरिया बेसियाना (फुले बिव्हेरिया) २० किलो प्रति हेक्टरी जमिनीत द्यावे.
लष्करी अळीलष्करी अळी नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी
डॉ. पी. जी. पाटीलकुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी