Join us

Cotton and Tur: सावधान, हवामानात होतोय बदल; तूर-कपाशीची अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 11:25 AM

Cotton and Tur: सध्या हवामानात बदल होत असून त्यानुसार कापूस आणि तुरीची कशी काळजी घ्यावी हे समजावून घेऊ

खरीप हंगामात सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. त्यामुळे सध्या खरीप हंगामातील तूर, उडीद, मूग, कपाशी, सोयाबीन ही पिके जोमात आहेत. त्यातच आता हवामान अंदाजानुसार पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. सध्या हवामानात होणाऱ्या बदलानुसार किडीपासून संरक्षणासाठी तूर, कपाशीची कशी काळजी घ्यावी, याबाबत माहिती दहिगावने (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विशेषतज्ज्ञ एम. पी. लाखे यांनी दिली.

तुरीवर वांझ रोगाचा प्रादुर्भाव? तूर पिकावर सुरुवातीच्या काळात वांझ रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. अशावेळी रोगट झाडे उपटून टाकावीत. वांझ रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पीक २० व ४० दिवसांचे असताना सल्फर ५० टक्के (डब्ल्यू. पी.) ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी अथवा निमऑइल ४० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रोप मर, मूळ खोड कुजला काय कराल? रोप मर किंवा कोरडी मूळ खोड कूज आढळून येत असल्यास रोगट झाडांना बोर्डो मिश्रण १० टक्क्यांची आळवणी करावी किंवा ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस २ किलो प्रत्येकी २० ते २५ किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून प्रतिएकर रोपाच्या बाजूने ४ ते ६ इंच अंतरावर दूर अळी करून घालावे. मावा फुलकिडे या सारख्या रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी निमार्क ५ टक्क्यांची फवारणी द्यावी.

कपाशी बांधावर तणनाशक फवारणी टाळा.ज्या ठिकाणी वेळेत पेरणी झाली आहे त्या पिकात फांद्या फुटण्याची अवस्था सुरू झाली आहे. या काळात पिकात पाण्याचा ताण टाळण्यासाठी कुळवणी करून मातीची भार द्यावी, ज्या ठिकाणी अतिरिक्त पाणी साचत असेल तिथे निचऱ्याची व्यवस्था करावी. §आजूबाजूच्या शेतात किंवा बांधावर तणनाशक फवारणी टाळावी. ज्या ठिकाणी बियाणाची उगवण झाली नसेल तेथील नांगे भरून घ्यावेत.

फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढीची शक्यता 

  • कोरड्या हवामानात फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यासाठी फ्लोनिकॅमीड ५० डब्ल्यू. जी. २ ग्रॅम किंवा निंबोळी अर्क ५० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.
  • शेतामध्ये पिवळे निळे चिकट सापळे २० ते २५ प्रतिएकर प्रमाणे लावावेत.
  • ओल असेल तर शेताच्या भोवती मका, झेंडू, चवळी एक आड एक दोन ओळीमध्ये लावून द्यावे.

उन्हाळी कपाशीसाठी गंध सापळेउन्हाळी कापशी पाते फुलाच्या अवस्थेत आहे. तेथे शेतात गुलाबी बोंड अळीसाठी गंध सापळे एकरी ८-१० या प्रमाणत लावावेत. शेताच्या अवत भोवती झाडे नसतील तर २०-२५ पक्षी थांबे उभारावेत. आकस्मिक रोप मर आढळून येत असल्यास बोर्डो मिश्रण १० टक्क्यांची आळवणी द्यावी. त्यापाठोपाठ १.५ किलो युरिया व १.५ किलो पालाश १०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

टॅग्स :कापूसखरीपशेती क्षेत्र