Join us

पिकांना पाणी कमी पडतंय; करा ह्या उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 3:20 PM

चालू वर्षी तीव्र उन्हाळा असून, चा पाणीटंचाई आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पिकांसाठी काटकसरीने काळजीपूवर्क वापर करणे आवश्यक आहे.

चालू वर्षी तीव्र उन्हाळा असून, चा पाणीटंचाई आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पिकांसाठी काटकसरीने काळजीपूवर्क वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

  • उन्हाळी पिकांसाठी ठिबक सिंचनद्वारेपाणी देण्यासाठी प्राधान्य द्यावे, जेणेकरून पाण्याची बचत होईल.
  • शेतावरील पालापाचोळा, उसाचे पाचट, काडीकचरा आदींचा फळबागा आच्छादनासाठी वापर करावा. त्यामुळे पाण्याची गरज २० ते ३० टक्क्यांनी कमी होते. तसेच जमिनीमध्ये हवा खेळती राहते व तणाचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • कलमे रोपे, भाजीपाला रोपे तयार करण्यासाठी शेडनेटचा वापर करावा.
  • मृद आरोग्य पत्रिका माहितीचा वापर करून शेतकऱ्यांनी उन्हाळी शेती पिकांसाठी सुपिकता निर्देशांकानुसार रासायनिक खतांचा वापर करावा.
  • उन्हाच्या तीव्रतेमुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. अशावेळी शक्य तेथे परावर्तकांचा वापर करावा. (उदा. केओलीन, पांढरा रंग)
  • पिकांच्या अंतररंगातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होते. ते कमी करण्यासाठी खालच्या भागाकडील पाने कमी करावीत, त्यामुळे पिकाचा ताण कमी होण्यास मदत होते.
  • शेताच्या बांधावर वारा प्रतिरोधकांचा वापर करावा, जेणेकरून जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल.
  • फळझाडांमध्ये मटका सिंचन पद्धत अवलंबता येईल.
  • जमिनीची तापमान वाढू नये म्हणून आच्छादन करून घ्यावे.
  • शेतकऱ्यांनी पाणी देण्याची वेळ संध्याकाळी ठेवावी किंवा सकाळी लवकरही पाणी देऊ शकता.
टॅग्स :पीकपाणीशेतकरीशेतीखतेठिबक सिंचन