Join us

Turmeric Cultivation हळद लागवड करताय; बेण्याची निवड कशी कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 11:26 AM

पूर्वमशागतीनंतर आपल्या जमीन प्रकार व पाण्याच्या उपलब्धतेनुसार हळदीची जातीची निवड करून योग्य आकाराचे बेणे मिळवावे याची निवड कशी करावी?

पूर्वमशागतीनंतर आपल्या जमीन प्रकार व पाण्याच्या उपलब्धतेनुसार हळदीची जातीची निवड करून योग्य आकाराचे बेणे मिळवावे. बेण्यांची सुप्तावस्था मोडल्यानंतर रुंद वरंबा पद्धतीने हळदीची लागवड करावी.

हळद लागवडीसाठी जेठा गड्डे, बगल गड्डे आणि हळकुंडे बेणे म्हणून वापरली जातात. बेणे निवडतांना खालील काळजी घ्यावी.

१) जेठा गड्डा- मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठा गड्डा अथवा मातृकंद किंवा गड्डा असे संबोधतात.प्रामुख्याने लागवडीसाठी बेणे हे मातृकंदाचेच ठेवावे.- सशक्त, निरोगी, जाड मातृकंद गड्डे बेणे म्हणून निवडावेत.- बेण्यासाठी निवडलेल्या मातृकंदाचे वजन ५० ग्रॅम पेक्षा जास्त असावे.- आकाराने त्रिकोणाकृती असावे.

२) हळकुंडे- बगल गड्ड्याला आलेल्या कंदास हळकुंडे असे म्हणतात.- हळकुंडेदेखील बियाण्यासाठी वापरली जातात.- बेणेसाठी निवडलेल्या हळकुंडांचे वजन ३० ग्रॅम  पेक्षा जास्त असावे.- जर मातृकंद कमी पडत असतील, तर हळकुंडे बेणे म्हणून वापरावेत.- निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान आकाराची भेसळ मुक्त असावीत.

३) बगल गड्डे- जेट्ठे गड्ड्याला आलेल्या फुटवे म्हणजे बगल गड्डे.- ४० ग्रॅम  पेक्षा जास्त वजनाचे बेण्यासाठी निवड करावी.

महत्वाचेहळद लागवडीसाठी हळकुंडे व बगलगड्डे वापरण्यापेक्षा जेठे गड्डे वापरावे, त्यामुळे उत्पादन २५  ते ३०%  जास्त येते.

अधिक वाचा: उन्हाळ्यात केलेल्या जमीन मशागतीचे हे आहेत चार फायदे

टॅग्स :शेतीपीकपीक व्यवस्थापनपेरणीलागवड, मशागत