Lokmat Agro >स्मार्ट शेती > हरभरा पेरणी करताय? हे आहेत महाराष्ट्रातील हरभऱ्याचे फेमस वाण.. वाचा सविस्तर

हरभरा पेरणी करताय? हे आहेत महाराष्ट्रातील हरभऱ्याचे फेमस वाण.. वाचा सविस्तर

Cultivation of chick pea? These are the famous varieties of gram chick pea in Maharashtra read in detail | हरभरा पेरणी करताय? हे आहेत महाराष्ट्रातील हरभऱ्याचे फेमस वाण.. वाचा सविस्तर

हरभरा पेरणी करताय? हे आहेत महाराष्ट्रातील हरभऱ्याचे फेमस वाण.. वाचा सविस्तर

हरभरा पिकाची उत्पादन वाढवायचे असेल तर हरभरा पेरणीसाठी सुधारित वाण निवडणे जरुरीचे आहे. देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत आणि फुले विश्वराज हे वाण मर रोग प्रतिकारक्षम असून, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

काबुली हरभऱ्यामध्ये विराट, पी. के.व्ही -२ (काक-२) पीकेव्ही-४ आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत.

यापैकी विजय, दिग्विजय, फुले विक्रम आणि फुले विश्वराज हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत. पाण्याची उपलब्धता असेल तर खतमात्रा व पाण्यास ते चांगले प्रतिसाद देतात. या शिवाय फुले विक्रांत हा वाण बागायत लागवडीसाठी उपयुक्त आहे.

विशाल हा टपोऱ्या दाण्यांचा वाण आहे. विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे. फुले विक्रम हा नविन वाण यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यासाठी प्रसारीत केला आहे.

हरभरा पिकाचे सुधारित वाण पुढीलप्रमाणे
१) विजय

कालावधी : जिरायत ८५ ते ९० दिवस, बागायत १०५ ते ११० दिवस.
उत्पन्न (क्विं./हे.) : जिरायत प्रायोगिक उत्पन्न १४-१५,  बागायत प्रायोगिक उत्पन्न ३५-४०, उशिरा पेरणी प्रायोगिक उत्पन्न १६-१८.
वैशिष्ट्ये : अधिक उत्पादन क्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्याकरिता प्रसारीत.

२) विशाल
कालावधी : ११० ते ११५ दिवस.
उत्पन्न (क्विं./हे.) : जिरायत प्रायोगिक उत्पन्न १४-१५, बागायत प्रायोगिक उत्पन्न ३०-३५.
वैशिष्ट्ये : आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादन, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.

३) दिग्विजय
कालावधी : जिरायत ९० ते ९५ दिवस / बागायत १०५ ते ११० दिवस.
उत्पन्न (क्विं./हे.) : जिरायत प्रायोगिक उत्पन्न १४-१५ , बागायत प्रायोगिक उत्पन्न ३५-४०, उशिरा पेरणी प्रायोगिक उत्पन्न २०-२२.
वैशिष्ट्ये : पिवळसर तांबूस,टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.

४) विराट
कालावधी : ११० ते ११५ दिवस.
उत्पन्न (क्विं./हे.) : जिरायत प्रायोगिक उत्पन्न १०-१२, बागायत प्रायोगिक उत्पन्न ३०-३२.
वैशिष्ट्ये : काबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.

५) कृपा
कालावधी : १०५ ते ११० दिवस.
उत्पन्न (क्विं./हे.) : प्रायोगिक उत्पन्न ३०-३२, सरासरी १८.
वैशिष्ट्ये : जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, दागे सफेद पांढन्या रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांकरिता प्रसारित (१०० दाण्यांचे वजन ५९.४ ग्रॅम)

६) जाकी ९२१८
कालावधी : १०५ ते ११० दिवस.
उत्पन्न (क्विं./हे.) : बागायत प्रायोगीक उत्पन्न ३०-३२ , सरासरी १८-२०.
वैशिष्ट्ये : टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य, महाराष्ट्राकरीता प्रसारीत.

कडधान्य सुधार प्रकल्प
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

Web Title: Cultivation of chick pea? These are the famous varieties of gram chick pea in Maharashtra read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.