Lokmat Agro >स्मार्ट शेती > Agroforestry बांधावर लावा हे झाड अन् करा ह्याची शेती

Agroforestry बांधावर लावा हे झाड अन् करा ह्याची शेती

Cultivation of teakwood Cultivation on farm bund or in field Cultivation | Agroforestry बांधावर लावा हे झाड अन् करा ह्याची शेती

Agroforestry बांधावर लावा हे झाड अन् करा ह्याची शेती

साग लाकडाचा आकर्षक रंग व त्यात असलेला चिवटपणा, तासकाम करण्यासाठी असलेला सोपेपणा, पाण्यात अधिक काळ टिकूनराहण्याची क्षमता, अशा वैशिष्ट्यपूर्ण सागाच्या लाकडाला अनादीकाळापासून अनन्यसाधारण महत्व आहे.

साग लाकडाचा आकर्षक रंग व त्यात असलेला चिवटपणा, तासकाम करण्यासाठी असलेला सोपेपणा, पाण्यात अधिक काळ टिकूनराहण्याची क्षमता, अशा वैशिष्ट्यपूर्ण सागाच्या लाकडाला अनादीकाळापासून अनन्यसाधारण महत्व आहे.

शेअर :

Join us
Join usNext

साग हा अत्यंत मौल्यवान वृक्ष असून त्याला लाकडाचा राजा समजतात. सागाचा उपयोग इमारत, फर्निचर, औद्योगिक अशा नित्योपयोगी वस्तूंसाठी होतो.

लाकडाचा आकर्षक रंग व त्यात असलेला चिवटपणा, तासकाम करण्यासाठी असलेला सोपेपणा, पाण्यात अधिक काळ टिकूनराहण्याची क्षमता, अशा वैशिष्ट्यपूर्ण सागाच्या लाकडाला अनादीकाळापासून अनन्यसाधारण महत्व आहे. आंबा, काजू बागायतीच्या कुंपणालगत सागाची लागवड करणे फायदेशीर ठरते.

हवामान
सागाची लागवड उष्ण व दमट हवामानात चांगल्या प्रकारे होते. सागवानाला १०० ते ३८० सेल्सिअसपर्यंत तापमान मानवते. यापेक्षा कमी जास्त तापमानामुळे सागाची वाढ मर्यादित होते. समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंचीपर्यंत या वृक्षाची वाढ चांगली होते.

जमीन
सागाच्या लागवडीसाठी थोडीफार चढ-उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. काळी, चिकट माती असेल तर सागाची वाढ समाधानकारक होत नाही तसेच उथळ, निचरा न होणारी, फार दलदलीची जमीन साग लागवडीसाठी अयोग्य आहे.

बीजप्रक्रिया
सागाचे बियाणे पेरून, रोपांची लागवड करून किंवा खोडकूळ (स्टम्प) लावून लागवड करता येते. सागाच्या बियांवरील कवच मऊ करून अंकूर येण्यास सुलभ करण्यासाठी पावसाळ्यात मोकळ्या जागेत सिमेंटच्या चबुतऱ्यावर किंवा टणक पृष्ठभागावर बियाणे पसरावे. दररोज दाताळ्याने खाली वर करावे, असे केल्याने सुमारे ४ ते ६ आठवड्यानंतर बियांवरील कवच मऊ होऊन बी रुजण्यास मदत होते.

रोपे तयार करणे
-
प्रक्रिया केलेल्या बियाण्यांपासून पॉलिथिन पिशवीत रोपे तयार करण्यासाठी माती, वाळू, शेणखत १:१:१ प्रमाणात मिश्रण तयार करून ते १० ते २० सेंटीमीटर पिशवीत प्रक्रिया केलेले बियाणे पेरावे.
- खोडकूळ (स्टम्प) बनवण्यासाठी एक वर्षानंतर रोपे गादीवाफ्यावरून उपटावी.
- तीक्ष्ण धार असलेल्या चाकूने मुळाकडील १५ ते २० सेंटीमीटर भाग ठेवून बाकीचा भाग कापून टाकवा.
- तसेच मुळाचा खोडाकडील १.५ ते २ सेंटीमीटर भाग ठेवून बाकीचा भाग कापावा. हे करताना तिरपा एकच घाव घालावा.
- पाने व छोट्या मुळ्या काढाव्यात. तयार केलेले खोडकूळ (स्टम्प) जितक्या लवकर रोपवनात लावले जाईल तितके चांगले.
- जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर सागाची लागवड करणे योग्य आहे.

रोग व किडी
-
सागाच्या झाडावर हुमणी व प्युरा या किडी व भुरी रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. हुमणी अळीच्या बंदोबस्तासाठी जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात फेनव्हलरेट १.५ टक्के भुकटी सागाच्या दोन ओळींमध्ये टाकावी. पाने खाणारी कीड सागाच्या पानांची मध्यशीर सोडून संपूर्ण पान खाते.
भुरीमुळे सागाच्या पानावर पांढरे ठिपके आढळतात. त्यामुळे सागाच्या झाडावर विशेष असा परिणाम होत नाही. मात्र अधिक प्रादुर्भाव टाळण्यासाठी डायथेन एम-४५ ची फवारणी करावी. साग लागवडीबाबत आपल्याकडील सागा व्यतिरिक्त आफ्रीकन, ऑस्ट्रलियन लागवडीसाठी प्रयत्न होत आहेत.

अधिक वाचा: कोथिंबीरीपेक्षा धण्यात मिळतोय जास्त नफा, कशी कराल धणे लागवड

Web Title: Cultivation of teakwood Cultivation on farm bund or in field Cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.