Lokmat Agro >स्मार्ट शेती > सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीच्या खतातील ह्या दोन पिकांची करा लागवड

सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीच्या खतातील ह्या दोन पिकांची करा लागवड

Cultivation of these two green manure crops to increase the organic carbon in soil | सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीच्या खतातील ह्या दोन पिकांची करा लागवड

सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीच्या खतातील ह्या दोन पिकांची करा लागवड

सेंद्रिय खते पिकांना जास्त प्रमाणात लागतात. परंतू आपण त्याप्रमाणात देवू शकत नाही. कारण या खतांचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत जमिनीचा पोत, कस, सुपिकता टिकविण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणे काळाची गरज आहे.

सेंद्रिय खते पिकांना जास्त प्रमाणात लागतात. परंतू आपण त्याप्रमाणात देवू शकत नाही. कारण या खतांचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत जमिनीचा पोत, कस, सुपिकता टिकविण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणे काळाची गरज आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जमिनीचा पोत चांगला ठेवायचा असेल आणि जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून आपल्याला पुढच्या पिढीला आपली जमीन द्यायची असेल तर आपण जमिनीमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे.

सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना आपण सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा वापर करत असताना आपण आपल्या शेतामध्ये हिरवळीचे खत वापरणे गरजेचे आहे. 

सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा महत्वाचा गुणधर्म आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये १ टक्केपेक्षा सेंद्रिय कर्बची पातळी राखणे आवश्यक आहे. परंतू हे प्रमाण हळूहळू कमी होत आहे.

सेंद्रिय खते पिकांना जास्त प्रमाणात लागतात. परंतू आपण त्याप्रमाणात देवू शकत नाही. कारण या खतांचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत जमिनीचा पोत, कस, सुपिकता टिकविण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणे काळाची गरज आहे.

हिरवळीचे खत हे इतर शेणखत व कंपोस्टखत यांना पर्याय ठरु शकत नाही. आजच्या काळामध्ये सेंद्रिय खतांच्या किंमती व रासायनिक खतांच्या किंमती वाढलेल्या आहेत. खतावरील खर्च कमी करण्यासाठी हिरवळीच्या खतांची मदत होते.

हिरवळीचे खत जमिनीमध्ये वनस्पतींची हिरवी पाने किंवा जमिनीमध्ये हिरवी पिके वाढवून पीक फुलोऱ्यात असतांना त्याच जमिनीमध्ये नांगरणीच्या सहाय्याने गाडतात. या पध्दतीस हिरवळीचे खत असे म्हणतात.

हिरवळीचे खते देणारी पिके
१) ताग

- ताग हे हिरवळिचे उत्तम खत आहे. ज्या विभागात पुरेसा पाऊस अथवा सिंचनाच्या पाण्याची हमी असते तेथे तागाचे पीक घेण्यात यावे.
- सर्व प्रकारच्या जमिनीत या खताची वाढ चांगली होत असली तरी आम्लधर्मिय जमिनीत या पीकांची वाढ जोमाने होत नाही.
- तसेच पाणी साचून राहणाऱ्या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही.
- पावसाळ्याच्या सुरूवातीस तागाचे बी हेक्टरी ५० ते ६० किलो पेरावे.
- पेरणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी हे पीक फुलोऱ्यावर येण्याच्या सुमारास ६० ते ७० से.मी. उंच वाढली असतांना नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडून टाकावे.
- तागामध्ये नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के असून या पिकापासून हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र मिळते.

२) धैंचा
-
 तागापेक्षा काटक असे हिरवळीचे हे पीक असून कमी पर्जन्यमान, पाणथळ, क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीत हे पिक तग धरु शकते.
- या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावरही गाठी दिसून येतात या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात.
- या पिकांच्या लगवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियाणे पावसाळ्याच्या सुरूवातीस शेतात पेरावे.
- बियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी त्यास गंधकाची प्रक्रिय करून परत थंड पाण्याने धुवावे आणि त्यानंतर रायझोबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिय बियाण्यास करावी.
- पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० से.मी उंचीपर्यत वाढले असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे.
- या काळात धैंच्यापासून १० ते २० टनापर्यत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते. या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ टक्के इतके आहे. भाताची लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते.

हिरवळीच्या खताचे फायदे
हिरवळीच्या खताचा मधील सेंद्रिय द्रव्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवाणूंना अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
लवकर कुजणारे हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्पुरदचे प्रमाण आणि अॅझोटोबॅक्‍टर सारख्या जिवाणूंचे प्रमाण वाढते.
जमिनीच्या जलधारण क्षमता वाढते. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी होते.
सेंद्रिय पदार्थामुळे माती रवेदार होण्यास मदत होते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत साचून राहता त्याचा निचरा लवकर होतो.
हलक्‍या जमिनीत देखील सेंद्रिय पदार्थांमुळे पाणी धारण क्षमता वाढते.
- काही हिरवळीची पिके हवेतील नत्र शोषून घेतात आणि ते नत्र जमिनीत साठवले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होते.
क्षार जमिनीत हिरवळीचे पीक गाडल्यामुळे जमिनीतील क्षार कमी होऊन त्या जमिनी लागवडीखाली आणता येतात.
हिरवळीच्या खताचे पिके जमिनीत असेंद्रिय स्फुरदाचे सेंद्रिय स्फूरदात रूपांतर करतात व जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितात.
हिरवळीच्या पिकांच्या दाट वाढीमुळे तणांचा नायनाट होण्यास मदत होते.

Web Title: Cultivation of these two green manure crops to increase the organic carbon in soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.