मर रोगाची लक्षणे पाहिल्यावर सर्वप्रथम त्याचे कारण बुरशीजन्य सेराटोसाइटीस/फ्युजॅरीयम इ. रोगजनकांमुळे उद्भवू शकते का ते शोधा. पाने पिवळसरपणाच्या पहिल्या/सुरुवातीच्या लक्षणांवर मर ओळखा.
प्रथम लक्षणे दिसताच बाधित शाखेची मुळे तपासा व काढून उभी चिरा. जर मुळामध्ये गर्द पिवळ्या/तपकिरी/राखाडी रंगाची वाढ दिसली आणि अल्कोहोलिक/फळांचा वास आला तर त्यातील लक्षणे सेराटोसिस्टीस बुरशीमुळे होणाऱ्या मर रोगाची आहेत असे समजावे.
कधीकधी, इतर मूळ कुज करणाऱ्या बुरशी जसे की फूसॅरीयम, रायझोक्टोनिया, स्क्लेरोशियम किंवा फायटोफोथोरा देखील विल्टशी संबंधित असल्याचे आढळले आहे.
विश्रांतीच्या कालावधीत, किंवा पीक नियमनच्या सुरुवातीच्या टप्प्यावर काढणीनंतर लगेचच वाळलेल्या झाडांच्या सभोवतालच्या निरोगी रोपांसाठी आळवणी (ड्रेंचिंग) किंवा जिथे नुकतीच सुरुवात होईल अश्या ठिकाणी ड्रेंचिंगला प्राधान्य द्या.
ड्रेंचिंगच्या एक दिवस आधी, जमिनीत व्यवस्थित पाणी द्यावे. पुढील दिवशी खाली दिलेल्या पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीने ड्रेंचिंग करा. उत्तम परिणामांसाठी ड्रेंचिंगनंतर २-३ दिवसांनी पाणी देऊ नका.
सेराटोसिस्टीस, फूसॅरीयम, राइझोक्टोनिया, स्क्लेरोशियम एसपीपी होणाऱ्या मर व्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब करावा.
पद्धत पहिली
- पहिली ड्रेंचिंग प्रोपिकोनाझोल २५% इ सी @ २ मिली प्रती लिटर + क्लोरपायरीफॉस २०% ई सी @ २ मिली प्रती लिटर किंवा थायोमिथोक्झाम २५% ब्ल्यु जी @ १-१.५ ग्रॅम प्रती लिटर ने करावी. (झाडाच्या वयाप्रमाणे ५ ते १० लिटर पाणी प्रती झाड वापरावे)
- पहिल्या ड्रेंचिंगच्या ३० दिवसानंतर दुसरी ड्रेंचिंग अॅस्परजिलस नायजर (ए एन २७) बुरशी ५ ग्रॅम २ किलो शेणखतामध्ये मिसळून प्रती झाड टाका.
- दुसऱ्या ड्रेंचिंगच्या ३० दिवसानंतर तिसरी ड्रेंचिंग आर्बस्क्युलर मायकोरायझा बुरशी (ए एम एफ) (राईझोफॅगस इंर्रेगुल्यारीस/ग्लोमस इंट्राडॅलिसिस) हे २५ ग्रॅम ही २ किलो शेणखतामध्ये मिसळून प्रती झाड टाका.
पद्धत दूसरी
प्रोपिकोनाझोल २५% इ सी @ २ मिली प्रती लिटर + क्लोरोपायरीफोस २०% इ सी @ २ मिली प्रती लिटर २० दिवसांच्या अंतराने ३ वेळा ड्रेचिंग करावे. (झाडाच्या वयाप्रमाणे ५ ते १० लिटर पाणी प्रती झाड वापरावे).
पद्धत तिसरी
- पहिली व तिसरी ड्रेंचिंग फोसेटिल ए एल ८०% डब्ल्यू पी @ ६ ग्रॅम प्रती झाड आणि दुसरी व चौथी ड्रेंचिंग टेब्यूकोनाझोल २५.९% डब्ल्यू/डब्ल्यू ई सी @ ३ मिली प्रती झाड (झाडाच्या वयाप्रमाणे ५ ते १० लिटर पाणी प्रती झाड वापरावे) याप्रमाणे २० दिवसांच्या अंतराने करावी.
- मर रोग जर फायटॉपथोरा बुरशीमुळे झाला असेल तर मेटालॅक्झील ८% + मॅनकोझेब ६४% डब्ल्यू पी @ २-२.५ ग्रॅम प्रती लिटर याप्रमाणे ड्रेंचिंग करावे.
- वाळलेल्या (आंशिक किंवा पूर्ण) प्रभावित झाडांवर उपचारः प्रभावित झाडे काढून टाका आणि उपटलेल्या झाडांवरील प्रादुर्भित माती निरोगी रोपांवर न पसरवता काळजीपूर्वक नष्ट करा/विल्हेवाट लावा.
- पाऊस नसताना काढलेल्या झाडाजवळील मातीला व्यवस्थित पाणी द्या व ६ आठवडे उष्ण महिन्यांत पारदर्शक रेखीय लो-डेन्सिटी पॉलीथिलीन (LLDPE) ५०-१०० मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिकने झाकून ठेवा. नंतर शिफारस केलेल्या बायो फॉर्म्युलेशनसह नवीन रोपे लावली जाऊ शकतात.
महत्वाचे
• ड्रेंचिंग विश्रांती काळात किंवा हंगामातील बहार नियोजनाच्या सुरूवातीला करावी.
• शॉट होल बोररचा प्रादुर्भाव असेल तर क्लोरोपायरीफोस २०% इ सी @ २ मिली प्रती लिटर वरील ड्रेंचिंगसोबत घेतले जाऊ शकते.
• झाडाला ड्रेंचिंग करतांना, रोगग्रस्त झाड आणि जेथे रोगग्रस्त माती पसरलेली असेल अशी सभोवतालची ४-५ झाडांनाही ड्रेंचिंग करावी.
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर