या कल्चरमध्ये विविध अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे सूक्ष्मजीव त्याच बरोबर पिकांवरील रोग व किडीला प्रतीकार करणारे सूक्ष्मजीव आहेत. या द्रावणातील विविध सूक्ष्मजीव व मायक्रोबीयल सेकंडरी मेटॅबोलाईटस् उदा. पॉलीकेटाईड व अल्काईन तयार करतात.
यामुळे झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्याचबरोबर ग्लुकोनेज बी, १-३ ग्लुकोनेज ही एन्झाईम्स तयार झाल्याने झाडामधील अंतरीम प्रतिकार क्षमता वाढते. डिकंम्पोजर द्रावणात स्फुरद विरघळवणारे जीवाणू व सुडोमोनस चे स्पेसीज च्या जीवाणूंचा समावेश असतो.
या कल्चरमध्ये सेल्युलोज डिग्रेडींग बॅक्टेरीया व झायलम डिग्रेडींग बॅक्टेरीया असल्यामुळे सेंद्रिय पदार्थ कुजवण्याची क्षमता ही चांगली असते.
डिकंम्पोजर द्रावण तयार करणेसाठी साहित्य डिकंम्पोजर कल्चर १० ग्रॅम, गुळ २ किलो, पाणी २०० लिटर, २०० लिटरचा ड्रम
कसे तयर कराल द्रावण- २०० लिटर ड्रममध्ये २०० लिटर पाणी + २ किलो गुळ + १० ग्रॅम डिकंप्मोजर कल्चर मिसळून घ्या.- यामधील सूक्ष्मजीव हवेत वाढणारे असल्याने दिवसातून दोन ते तीन वेळा काठीने हालवा किंवा ब्रुईंग करा.- ४ ते ५ दिवसात द्रावणावर सायीसारखा तवंग येतो.- द्रावणाचा पी.एच. ५ पेक्षा कमी होतो, त्यानंतर याचा वापर करा. द्रावण १ वर्षभर वापरू शकता.- पुन्हा तयार करणेसाठी १०० लिटर पाण्यासाठी एक किलो गुळ व १० लिटर तयार असलेले डिकंम्पोजर द्रावण विरजणासारखे वापरता येते.- डिकंम्पोजर द्रावणाचा वापर स्लरी, अर्क व चांगले सेंद्रिय खते तयार करणेसाठी प्रभावीपणे होतो.
फायदे१) सेंद्रिय पदार्थ कुजवण्याची क्रिया जलद झाल्यामुळे या पासून चांगल्या दर्जाचे सेंद्रीय खत तयार करता येते.२) जमीनीतील सुप्त अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी याचा वापर करता येतो.३) क्षारयुक्त चोपन जमीनीची सुधारणा करणेसाठी ही या द्रावणांचा वापर होतो.४) बिजप्रक्रियेसाठी किंवा अंकुरणक्षमता वाढवण्यासाठी याचा वापर होतो.५) स्लरी, अर्क, करणेसाठीही याचा वापर होतो.६) रोग, किड, नियंत्रण करणेसाठीही याचा वापर होतो.
केव्हा वापरावेडिकंम्पोजर द्रावण सर्व पिकांसाठी सर्व आवस्थेत वापरता येते. वाढीची आवस्था, फुले येण्याची आवस्था, फळ पक्वतेची आवस्था, डिकंम्पोजर द्रावण एकरी १०० ते २०० लिटर पाण्यामध्ये किंवा ठिबक मधून द्यावे.
अधिक वाचा: Bacterial Slurry जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढवायचीय; तयार करा ही सोपी स्लरी