Lokmat Agro >स्मार्ट शेती > Dhemase Lagwad : ढेमसे भाजीपाला पिकाची सुधारित पद्धतीने कशी कराल लागवड?

Dhemase Lagwad : ढेमसे भाजीपाला पिकाची सुधारित पद्धतीने कशी कराल लागवड?

Dhemase Lagwad : How to cultivate Tinda vegetable crop in an improved way? | Dhemase Lagwad : ढेमसे भाजीपाला पिकाची सुधारित पद्धतीने कशी कराल लागवड?

Dhemase Lagwad : ढेमसे भाजीपाला पिकाची सुधारित पद्धतीने कशी कराल लागवड?

ढेमसे १४० ते १५० दिवसाचे भाजीपाला पिक आहे. साधारणपणे लागवडीपासून ७५ ते ८० दिवसांनी तोडणी सुरु होते. अधिक उत्पादनासाठी लागवड तंत्र जाणून घेणे आवश्यक आहे.

ढेमसे १४० ते १५० दिवसाचे भाजीपाला पिक आहे. साधारणपणे लागवडीपासून ७५ ते ८० दिवसांनी तोडणी सुरु होते. अधिक उत्पादनासाठी लागवड तंत्र जाणून घेणे आवश्यक आहे.

शेअर :

Join us
Join usNext

ढेमसे १४० ते १५० दिवसाचे भाजीपाला पिक आहे. साधारणपणे लागवडीपासून ७५ ते ८० दिवसांनी तोडणी सुरु होते. अधिक उत्पादनासाठी लागवड तंत्र जाणून घेणे आवश्यक आहे.

जमीन व हवामान
मध्यम काळी निचऱ्याची, परंतु हलकी जमीन तसेच उष्ण व कोरडे हवामान या पिकास चांगले मानवते. १८ ते ३० डिग्री सें. तापमानात बियांची उगवण आणि ३० ते ३५ डिग्री सें. तापमानात पिकाची शारिरीक वाढ चांगली होते. अति उष्ण व दमट हवामान या पिकास मानवत नाही.

सुधारित जाती
अर्का टिंडा, पंजाब टिंडा, टिंडा एस.-४८३, अर्का अन्नामलाई इत्यादी.

लागवड हंगाम
उन्हाळी: जानेवारी-फेब्रुवारी
खरीपः जुलै- ऑगस्ट

बियाण्याचे प्रमाण
३ ते ४ किलो/हेक्टर

बीजप्रक्रिया
बियाणे २४ ते ४८ तास ओल्या कापडात बांधून ठेवावे. लागवडीपूर्वी 'कार्बेन्डॅझीम' या बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावे.

लागवडीचे अंतर
दोन ओळीतील अंतर १ मिटर, दोन वेलीतील अंतर ०.६० मिटर तसेच ३० मायक्रॉन जाडीच्या काळ्या-चंदेरी रंगाच्या कापडाचा आच्छादनासाठी उपयोग करावा

खात व्यवस्थापन
१० ते १५ टन शेणखत प्रति हेक्टर. लागवडीपूर्वी २५:५०:५० किलो नत्रःस्फुरदःपालाश प्रति हेक्टर आणि लागवडीनंतर ३० दिवसांनी २५ किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा बांगडी पध्दतीने द्यावी. आच्छादन केलेले असल्यास ठिबक सिंचनमधून खते द्यावीत. पिकाच्या जोमदार वाढीसाठी खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे.

पाणी व्यवस्थापन
लागवडीच्यावेळी सऱ्या ओलवून घ्याव्यात व नंतर लागवड करावी. खरीप हंगामात आणि उन्हाळी हंगामात असल्यास ५ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पीक फुलावर व फळधारणेच्या काळात पाण्याचा ताण आल्यास फूलगळ होते. फळांच्या संख्येत आणि वजनात घट येते.

फळांची काढणी
साधारणपणे लागवडीपासून ७५ ते ८० दिवसांनी तोडणी सुरु होते. जाती परत्वे ७ दिवसांच्या अंतराने १० ते १२ तोडण्या होतात. ढेमसे फळावर बारीक लव असते आणि नखाने दाबल्यास त्यावर ठसा उमटतो. त्यास कोवळे फळ समजावे. ढेमश्याची फळे लुसलुशीत कोवळी असताना काढणी करावी.

अधिक वाचा: Karale Lagwad : कारले लागवडीचे नियोजन करताय कोणते वाण निवडाल अन् कशी कराल लागवड

Web Title: Dhemase Lagwad : How to cultivate Tinda vegetable crop in an improved way?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.