Join us

डिजिटल शेती! साहेब म्हणजे मग जमिन कसायची का नाही?

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 22, 2024 4:35 PM

पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत डिजिटल शेती शेतकऱ्यांनी कशी फायद्याची?

शेकडो वर्षांपूर्वी ज्या माणसानं पहिलं बीयाणं मातीत रोवलं त्या पहिल्या शेतकऱ्याला आज आपण काय सांगू आजच्या शेतीविषयी? प्राचीन काळातल्या त्या शिकारी माणसाला शेकडो वर्षांपासून होत आलेली शेती आता डिजिटल झाली आहे.असं सांगितलं तर! पण त्याला का सांगायचं हे? कारण १२००० वर्षांपूर्वी त्यानं पेरलेल्या बियाणाचा आपण आज एक भाग आहोत. कदाचित त्यानं त्या काळात केलेल्या शेतीच्या  विकासामुळं आज आपल्या शहरी समाजाचं संक्रमण होत आलं आहे. आज हा बदल डिजिटल शेतीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 

प्रत्येक क्षेत्रातली माती वेगळी. हवामान वेगळं. अशावेळी त्या भागाच्या सर्व सुक्ष्म बारकाव्याच्या विश्लेषणातून शेतकऱ्याला अधिक उत्पन्न मिळण्याची दारं खुली होणार आहेत. या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर शेतकऱ्याला येणाऱ्या काळात फायद्याचा ठरणार आहे. क्षेत्रीय स्तरासह संशोधन प्रयोगशाळा आणि शेती उत्पादनाच्या क्षेत्रात डिजिटल शेती नवकल्पना देताना दिसत आहे.

डिजीटल शेती म्हणजे काय?

डिजिटल शेती ही शेती व कृषीविषयक पद्धतींसाठीची एक अशी छत्री आहे, ज्यात आपल्या शेतीविषयी सुक्ष्म स्तरावरच्या माहितीचं विश्लेषण एकत्र करता येतं. ज्या विश्लेषणातून जमिनीच्या, माती आणि पिकाच्या वाढीविषयी शेतकऱ्याला योग्य दिशा देईल.

पूर्वी हवामानाच्या चक्राशी जुळणाऱ्या अनेक वेगवेगळ्या लोककथा,वैयक्तीक अनुभव, पंचांगांवर पीक लागवड, काढणी होत असे. आता प्रगत हवामानाची माहिती मोबाईलवरून दाखवली जाऊ लागली. आपल्या शेतात काय घडतंय हे छोट्याशा खिशात मावत असल्याने शेतकऱ्यांचे महत्वाचे निर्णय आता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घेतले जाऊ लागले आहेत. जर आपल्या आजी आजोबांना आपण इतक्या 'हायटेक' शेतीविषयी सांगितले तर तेही अवाक झाल्याशिवाय राहणार नाहीत. १९५०- ६० च्या दशकात त्यांनी पाहिलेली शेती आणि आताच्या अधूनिक डिजिटल शेतीचं चित्र अगदी सिनेमातल्या दृष्यासारखं कदाचित दिसेल त्यांना!

अन्नपुरवठा साखळीतलं शेतीचं महत्व अनन्यसाधारण आहे. वेगवेगळ्या भूभागावर, हवामानाच्या, निसर्गाच्या अनेक संकटांना तोंड देत शेतीमध्ये बदल होत आले आहेत. २१ व्या शतकात माणसानं एवढी तांत्रिक प्रगती केली की  मानवी विकासाचा एक महत्वाचा टप्पा होता. आता डिजिटलीही करता येते.

काय होणार शेतकऱ्यांना फायदा?

  • पीक आरोग्य आणि पीक उत्पादन सुधारण्यास होणार मदत
  • पदार्थांची पौष्टिक घनता वाढवण्यासह अन्नाची हानी आणि कचरा कमी करण्यासाठी फायद्याचे..
  • शेतीचा खर्च कमी करण्यासाठी नवीन पिकांचा यशस्वी अवलंब करण्यासाठी होऊ शकतो उपयोग
  • अधिक प्रभावी जोखीम व्यवस्थापन कसे करावे यासाठी फायद्याचे..
  • एआय-चालित ऑटोमेशनसह कामगारांची कमतरता कमी करणे
  • उत्पादकांचे पर्यावरणाचे नुकसान कमी करण्यासाठी संपूर्ण अन्नसाखळीत कार्बन नेट शून्य साध्य करण्यात मदत करेल. 

हे मार्गदर्शन कशा स्वरुपाचे असेल?

आपल्या शेतात उगवलेला आणि पिकलेला टोमॅटो कधी काढायचा यासह कापणी तंत्रज्ञानापर्यंच्या अनेक कृषी उपाययोजना या डिजिटल शेतीमध्ये शक्य आहेत. अनेक देशांमध्ये याविषयीचे तंत्रज्ञान विकसितही होत आहे. एआयचलित तंत्रज्ञानासह उच्च कृषी तंत्रज्ञानानं शेतकऱ्यांचं जीवन बदलाच्या मार्गावर आहे. पिकांचं आरोग्य, आताचे हवामान, कापणीचा अंदाज, सेन्सरवर चालणारी उपकरणं वापरून बदलत्या हवामानाच्या काळात आपल्या शेतात पिकाची स्थिती ओळखून त्यानुसार उत्पन्न वाढवणारे हे तंत्रज्ञान शेतकऱ्याची मेहनत वाचवून त्याला स्मार्ट करेल हे निश्चित..

 

टॅग्स :शेतीडिजिटललागवड, मशागतशेतकरीतंत्रज्ञान