शेतातील उत्पादन वाढविण्यासाठी निविष्ठांचा योग्य वापर करून अधिकाधिक उत्पादन काढणे आज आवश्यक बनले आहे. योग्य तण व्यवस्थापन एक महत्वाची बाब आहे. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात तण नियंत्रणाची विशेष काळजी घेतल्यास नुकसान कमी प्रमाणात होते. तणामुळे पाणी, अन्नद्रव्य व जागेसाठी स्पर्धा होते.
खरीप पीकात वाढणारी विविध तणे
अ) एकदल वर्गीय तणे : लोना, केना, भरड, शिप्पी, चिकटा, हराळी, लव्हाळा, कुंदा, चिमणचारा, वाघनखी इत्यादी
ब) व्दिवल वर्गीय तणे : दिपमाळ, दुधी, माठ, काठेमाठ, कुंजरू, हजारदाणी, तांदुळजा, रानताग, पेटारी, शेवरा, पाथरी, चांदवेल, कुरूडु, गाजरगवत, उन्हाळी इत्यादी.
तणांची वैशिष्टये : तणांना निसर्गानेच काही अशी वैशिष्टये दिली आहेत की, आपण वर्षानुवर्ष अनेक उपाय योजुनही ती आजही तग धरून आहेत त्यांचा नायनाट होत नाही. प्रचंड बिजोत्पादन क्षमता, वेगवेगळी बियाण्यांची सुप्त अवस्था, प्रतिकुल परिस्थितीत तग धरून वाढण्याची क्षमता, कमी कालावधी, लवकर फळे, फुले लागणे, सहज प्रसार या गुणधर्मामुळे तणे पिकांच्या उत्पादनात घट आणतात.
खरीप पीकातील पीक तण स्पर्धेचा काळ
मका (१५ ते ३५ दिवस), भात (१५ ते ४५ दिवस), ज्वारी (१५ ते ४५ दिवस), बाजरी (२५ ते ४५ दिवस), सोयाबीन (१५ ते ४५ दिवस), उडिद (३० ते ४५ दिवस) सदरील पीक व तण स्पर्धेचा काळ पेरणीनंतरचे दिवस गृहित धरावे.
तणांमुळे होणारे पीक उत्पादनाचे नुकसान
अ.क्र. | खरीप पीक | नुकसान (टक्के) |
१ | भात | २५ ते ४० |
२ | मका | ४९ |
३ | खरीप ज्वारी | ६० ते ७० |
४ | बाजरी | २५ ते ४० |
५ | ऊस | ४० ते ६० |
तणांमुळे होणारे नुकसान :
१) पिकाच्या दर्जात होणारी घट२) पिकाच्या उत्पादनात येणारी घट३) पीक उत्पादन खर्चात होणारी वाढ४) तणे मनुष्यालाही अपाय करतात५) किटक व रोगांना आसरा देतात६) तण शेती अवजारांची झीज करतात७) तणे जमिणीची किंमत कमी करतात८) पाण्याच्या पाटाची वहन क्षमता कमी होते.
तणांचा बंदोबस्त करण्याच्या पद्धती
१) प्रतिबंधात्मक उपाय : १) स्वच्छ बी-बीयाणे वापरणे२) चांगले कंपोस्ट व शेणखत वापरणे३) बी धरण्यापुर्वी तणांचे रोपटे काढुन टाकावे४) तणांची वाढ नाहीसी करणे५) शेताचे बांध, पाण्याचे पाट, पाट व चर व भोवतालचे रस्ते तणांपासून मुक्त ठेवावेत६) अवजारांपासून तणांचा प्रसार रोखण्यासाठी तणमुक्त शेताची मशागत केल्यानंतर अवजारे स्वच्छ करून दुसऱ्या शेताकडे न्यावीत.
२) निवारणात्मक उपाययामध्ये हाताने वापरावयाची अवजारे, बैलाच्या किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने ओढली जाणारी मशागतीची अवजारे यांचा समावेश होतो. हाताने तण उपटने तसेच हातकोळपणी व खुरपणी करून तण काढणे व खांदणी करणे. पिकांच्या दोन ओळीत आच्छादनाचा वापर करून तणांचा बंदोबस्त करता येतो.
३) जैविक तण नियंत्रणया पद्धतीमध्ये किटकाव्दारे, जीवजंतूव्दारे (बुरशी, जिवाणू, विषाणू व सुत्रकृमी इत्यादी) तसेच परोपजीवी वनस्पतीव्दारे तणांचे नियंत्रण केले जाते. उदा. कोचीनियल किडीचा वापर करून निवडुंगाचा नाश करता येतो तसेच गाजरगवताच्या नियंत्रणासाठी मॅक्सीकन भुंगे वापर करता येतात.
४) रासायनिक पद्धतीने तणांचा बंदोबस्तनिरनिराळी उपयुक्त रसायने वापरून तणांचा बंदोबस्त करता येतो. या पद्धतीमध्ये जी रसायने वापरली जातात त्यांना तणनाशक असे म्हणतात. रासायनिक पद्धतीने तण नियंत्रण करतांना काही महत्वाच्या तांत्रिक बाबी पुढीलप्रमाणे१) लेबल क्लेमनुसार तणनाशकाची निवड व वापर करणे२) तणनाशकाचा शिफारशित मात्रा इतकाच वापर करणे त्यापेक्षा कमी अथवा अधिक वापर टाळणे, तणनाशक फवारणी पद्धतीनूसार नोझलचा वापर करणे, योग्यवेळी तणनाशकाची फवारणी उदा. पिक व तणे उगवणीपुर्वी व उगवणीपश्चात पिकावर व तणावर फवारणी करणे.
विविध खरीप पिकातील शिफारशीत तणनाशके
अ.क्र | पिकाचे नाव | तणनाशक | प्रमाण प्रती १० लि. पाणी | वापरण्याची पद्धत |
१ | सोयाबीन | पेंडीमियॅलीन ३८.७ टक्के सी.एस. इमॅझीथायपर १० टक्के डब्लु.एस.एल | २० ते ३५ मिली २० मिली | उगवणपुर्व उगवणीपश्चात |
२ | मका | अॅट्रॅझीन ५० डब्लु.पी. | १५ ते ३० ग्रॅम | उगवणपुर्व |
३ | भुईमुग | इमॅझीथायपर १० टक्के एस.एल | २० ते ३० मिली | उगवणपुर्व/उगवणीपश्चात |
४ | तूर | पेंडीमिथैलीन ३० टक्के ई.सी. | ३५ ते ५० मिली | उगवणपुर्व |
५ | कापूस | डीमियॅलीन ३८.७ टक्के सी.एस. पायरीयोओबॅक सोडीयम १० टक्के ई.सी | २० ते २५ मिली १२ ते १५ मिली | उगवणपुर्व उगवणपुर्व |
६ | ऊस | मेटासल्फुरॉन मिथील ३० टक्के डब्लु.पी. | ०.६ ग्रॅम | उगवणीपश्चात (३० ते ४० दिवस) |
तणनाशक फवारणीवेळी घ्यावयाची दक्षता :
१) फवारणीसाठी शक्यतो स्वतंत्र पंप वापरावा.२) तणनाशक फवारणीपूर्वी जमिनीत पुरेसा ओलावा असावा३) फवारणी पंपासाठी शिफारशीत नोझलचा वापर करावा.४) तणनाशके फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. गढुळ व गाळयुक्त पाणी वापरू नये.५) उभ्या पिकात तणनाशके फवारतांना हुडचा वापर करावा.
लेखकप्रा. संजय बाबासाहेब बडेसहाय्यक प्राध्यापक (कृषी विद्या विभाग)दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालयदहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर पिन कोड ४२३७०३, मो. नं. ७८८८२९७८५९
हेही वाचा - आरोग्यासाठी फायद्याचे मात्र आता होत आहे दुर्मिळ; जाणून घ्या कोणते आहेत हे भरडधान्य