Join us

वजन, शुगर वाढेल म्हणून आंबे खायचे टाळताय का? पण हे आहेत आंबा खाण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 10:22 AM

आंबे खायला आवडत नाहीत अशी व्यक्ती क्वचितच बघायला मिळेल? आंबे खाऊन वजन वाढते, असा समज बऱ्याच जणांचा असतो. त्यामुळे आंबे खायला आवडत असून देखील बरेच लोक मधुमेह आणि वजन वाढायच्या भीतीने आंबे खायचे टाळतात.

आंबे खायला आवडत नाहीत अशी व्यक्ती क्वचितच बघायला मिळेल? आंबे खाऊन वजन वाढते, असा समज बऱ्याच जणांचा असतो. त्यामुळे आंबे खायला आवडत असून देखील बरेच डायबेटिक पेशंट्स आणि ज्यांना वजन कमी करायचे आहे असे लोक मधुमेह आणि वजन वाढायच्या भीतीने आंबे खायचे टाळतात. पण, हा समज खरंच योग्य आहे का ?

१०० ग्रॅम आंब्याच्या फोडीमध्ये फक्त ६० कॅलरीज असतात, ज्या ६० कॅलरीज दिवसभराच्या गरजेच्या कॅलरीजच्या तुलनेत नगण्य आहेत. त्यामुळे रोज दिवसभरात १०० ते २०० ग्रॅम्स आंब्याच्या फोडी खाल्या, तर खूप काही शुगर वाढेल किंवा वजन वाढेल असे अजिबात नाही; उलट आंब्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K असे मल्टी व्हिटॅमिन असतात.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आंब्यामध्ये अतिशय प्रभावी असे बीटा कॅरोटीन नावाचे अँटीऑक्सिडंट आढळून येते. हे बीटा कॅरोटीन शरीरातल्या फ्री रॅडिकल्सचा सामना करून कॅन्सरचा धोकासुद्धा कमी करू शकते. आंब्यामध्ये असलेल्या AHAs (अल्फा हायड्रॉक्सी असिडस्) त्वचेच्या पृष्ठभागावरील निस्तेज आणि कोरड्या त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत होते. हे त्वचेची नैसर्गिक चमक बाहेर आणण्यास देखील मदत करते.

खा अन् फिट राहा!

  • ज्यांना स्मृतीभ्रंश आहे, त्यांनी आंब्यांचे सेवन करावे. यामध्ये आढळणारे ग्लुटामाइन अॅसिड नावाचे घटक स्मरणशक्ती वाढवण्यास उत्प्रेरक म्हणून काम करतात. यासोबतच रक्तपेशीही याद्वारे सक्रिय होतात. त्यामुळे गरोदर महिलांना आंबा खाण्याचा सल्ला दिला जातो.
  • आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी वरदान आहे. यामुळे डोळ्ळ्यांचा प्रकाश कायम राहतो.
  • उष्णता संरक्षण : उन्हाळ्यात जर दुपारी घराबाहेर पडावे लागत असेल तर एक ग्लास आंब्याचा रस पिऊन बाहेर पडावे. तुम्हाला उष्णता जाणवणार नाही. आंब्याचा रस प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते.
  • पचनक्रिया सुधारते : आंब्यामध्ये अनेक एन्झाइम असतात, ज्यामुळे अन्न लवकर पचते. यासोबतच यामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड, टार्टरीक अॅसिड शरीरातील आवश्यक घटकांना संतुलित ठेवते.
  • कोलेस्टेरॉलवर नियंत्रण : आंब्यात भरपूर फायबर, व्हिटॅमिन सी असते. यामुळे कोलेस्टेरॉल संतुलित होण्यास मदत होते.
  • त्वचेसाठी फायदेशीर : आंब्याच्या पल्पचा पॅक चेहऱ्यावर चोळल्याने चेहेरा चमकदार होतो आणि संसर्गपासूनही संरक्षण होते.

आंबे प्रमाणात खाल, तर फायद्यात राहाल !जर आपण आंबे किंवा कोणत्याही इयर फळाचे सेवन अति प्रमाणात केले तर शुगर आणि वजन वाढायची शक्यता वाढतेच, परंतु त्याच बरोबरीने फळांमध्ये असलेल्या फ्रुक्टोसच्या मेटाबोलिजमचा ताण लिव्हरवर आल्यामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. त्यामुळे आपल्या आवडीच्या आंब्यांचा हंगाम सुरू झालाय. आंबे खायचे न टाळता प्रमाणात खाऊन आंब्यांचा सिझन एन्जॉय करा आणि फिट राहा.

डॉ. अभिषेक मानेआहारतज्ज्ञ

टॅग्स :आंबाआरोग्यहेल्थ टिप्सडॉक्टरफळेमधुमेह