Join us

रेशीम व्यवसाय करताय; अनुदानासाठी कुठे कराल अर्ज?

By बिभिषण बागल | Published: August 28, 2023 4:00 PM

निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थतीशी जुळवुन घेण्यास सक्षम करुन शेती व्यवसाय फायदेशीर करणे हा मुख्य उद्देश आहे. यात रेशीम शेतीसाठी व व्यवसायासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प योजनेतून बाबीनिहाय अर्थसहाय्य दिले जाते.

निवळ लागवड क्षेत्र व लोकसंख्या या बाबत महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या स्थानी आहे. राज्यातील ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबुन आहे. कृषी क्षेत्राचा विकास अनियमीत पावसावर अवलंबुन आहे. महाराष्ट्र शासनाच्या वातावरणीय बदल कृती आराखड्याने सादर केलेल्या राज्यातील १५ जिल्ह्यामधील ५,१४२ गावांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आला आहे. सदर गावांची निवड लघु पाणलोट आधारीत करण्यात आलेली आहे. या निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थतीशी जुळवुन घेण्यास सक्षम करुन शेती व्यवसाय फायदेशीर करणे हा मुख्य उद्देश आहे. यात रेशीम शेतीसाठी व व्यवसायासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प योजनेतून बाबीनिहाय अर्थसहाय्य दिले जाते.

योजनेचे उद्देश- गाव व समुहामधे तुती लागवड करुन रेशीम उत्पादनात वाढ करणे.- या माध्यमातुन ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करणे.- शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करणे.- यासाठी (जनरल साठी ७५% प्रमाणे)१) तुती नर्सरी साठी - १,१२,५००/-२) तुती लागवडी साठी - ३७,५००/-३) किटक संगोपन गृह - १,२६,४१९/-४) साहित्य खरेदी - ५६,२५०/-

पात्रता निकष- पात्र अर्जदाराकडे  सिंचनाची सोय असणे आवश्यक आहे.- इच्छुक लाभार्थ्याकडे मध्यम ते पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.- रेशीम उद्योगामधे कुटूंबातील एक व्यक्ती स्वत: शेतात तुती लागवड संगोपनाचे काम करणारी असावी.- समुह पध्दतीने गावात लागवडीला प्राधान्य देणारे असावे.- रेशीम उद्योगाकरीता निवडलेल्या शेतकऱ्यांने प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

समाविष्ट बाबी:- लाभार्थ्यांने किमान तीन वर्ष रेशीम उद्योग करावा.- तुती लागवडीचा कालावधी जुन ते सप्टेंबर अखेर राहील.- एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देता येईल.- या घटकास संकेत स्थळावर व ग्रामपंचायतच्या नोटिस बोर्डावर व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी.- तुती लागवड ही प्रत्यक्ष रोपानेच करण्यात यावी.- तुती लावगड न करता किटक संगोपन किंवा इतर बाबीचे अनुदान देय राहणार नाही.

अर्थसहाय्यतुती रोपे तयार करणे साठी अर्थसहाय्य (प्रति एकर)मंजूर मापदंडा नुसार खर्च (Unit cost): १,५०,०००/- प्रकल्प अर्थ सहाय्याचे प्रमाण (मंजूर मापदंडानुसार): अ) सर्वसाधारण गट (७५%): १,१२,५००/- ब) अ.जाती/अ.जमाती (९०%): १.३५,०००/-

तुती लागवड विकास कार्यक्रमांकरीता सहाय्य (प्रति एकर)मंजूर मापदंडा नुसार खर्च (Unit cost): ५०,०००/- प्रकल्प अर्थ सहाय्याचे प्रमाण (मंजूर मापदंडानुसार): अ) सर्वसाधारण गट (७५%): ३७,५००/- ब) अ.जाती/अ.जमाती (९०%): ४५,०००/-

दर्जेदार कोष उत्पादनासाठी- किटक|संगोपन साहित्य/शेती अवजारे साहित्य पुरवठा सहाय्य आधुनिक माउंटेज (Rotary Mountages) सहित (प्रति लाभार्थी)मंजूर मापदंडा नुसार खर्च (Unit cost): ७५,०००/- प्रकल्प अर्थ सहाय्याचे प्रमाण (मंजूर मापदंडानुसार): अ) सर्वसाधारण गट (७५%): ५६,२००/- ब) अ.जाती/अ.जमाती (९०%): ६७,५००/-

किटक संगोपन गृह बांधणी साठी सहाय्य (प्रति लाभार्थी)मॉडेल-१ (१,००० चौ. फुट)मंजूर मापदंडा नुसार खर्च (Unit cost): १,६८,६३९/- प्रकल्प अर्थ सहाय्याचे प्रमाण (मंजूर मापदंडानुसार): अ) सर्वसाधारण गट (७५%): १,२६,४७९/- ब) अ.जाती/अ.जमाती (९०%): १,५१,७७५/-मॉडेल-२ (६०० चौ. फुट)मंजूर मापदंडा नुसार खर्च (Unit cost): ९५,१९७/- प्रकल्प अर्थ सहाय्याचे प्रमाण (मंजूर मापदंडानुसार): अ) सर्वसाधारण गट (७५%): ७१,३९७/- ब) अ.जाती/अ.जमाती (९०%): ८५,६७७/-

अर्ज कसा करावा?- ज्या शेतकऱ्यांना अर्ज करावयाचा असेल त्यांनी www.mahapocra.gov.in या संकेतस्तळावर ऑनलाईन नोंदणी करुन सामाविष्ट प्रत्येक बाबी करीता स्वतंत्र अर्ज करावा.- अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे सादर करावीत.- अर्जदाराचा ७/१२ आणि ८-अ चा उतारा.- आधार कार्डशी सलग्न असणारा मोबाईल नंबर अपडेट ठेवावा.- सर्व माहिती ग्राम कृषी संजीवनी समिती कडे सादर करावी.

वैयक्तीक लाभाकरीता खालील प्रमाणे ऑनलाईन प्रकीया आहे.

आवश्यक कागदपत्रे: (वैयक्तीक लाभ घटक बाबी)- शेतकऱ्यांचा विहित नमुन्यातील अर्ज जमिनीचा ७/१२, ८-अ, सामाजिक प्रवर्ग/दिव्यांग यांचे प्रमाणपत्र- समुह सहाय्यक ग्राम कृषी संजीवनी समिती (VCRMC)- मान्यता-ग्राम कृषी संजीवनी समिती (VCRMC)- तांत्रिक पडताळणी-कृषी सहाय्यक- पुर्व संमती-उपविभागीय कृषी अधिकारी- लाभार्थ्यांमार्फत मंजुर घटकाची अंमलबजाणी- लाभार्थ्यांने अमंलबजावणी केली असलेबाबत समुह सहाय्यक/कृषी सहाय्यक यांना अवगत करणे- मोका तपासणी- प्रस्तावाची छाननी-प्रकल्प उपविभाग स्तर (कृषी पर्यवेक्षक)- अनुदान मंजुर-उपविभागीय कृषी अधिकारी- DBT द्वारे लाभार्थ्यांचा बँक खात्यात थेट अनुदान अदायगी

वरील सर्व प्रक्रीया ऑनलाईन आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयास भेट द्या.

टॅग्स :रेशीमशेतीशेतकरीशेतीपीकसरकारसरकारी योजनाराज्य सरकार