E-Peek Pahani DCS Mobile App रब्बी हंगाम १ डिसेंबर २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु झाली असून, शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे करिता आधी ई-पीक पाहणी मोबाईल अॅप उपलब्ध होते.
परंतु आता केंद्र शासनच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन रुपात ई-पीक पाहणी DCS उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यानंतर १००% पीक पाहणी नवीन सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे.
शेतकरी स्वतः पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल अॅप द्वारे नोंदवायचे व उर्वरित पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदविलेली नाही ते तलाठी यांच्या मार्फत होत असायची.
त्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करणे करिता सहाय्यक यांची नेमणूक करण्यात येत आहे. प्रत्येक गावासाठी १ सहाय्यक उपलब्ध राहणार असून सहाय्यक मार्फत पीक नोंदणी होणार आहे.
ई पीक पाहणी अँप च्या सहाय्याने पिकांची माहिती नोंदवण्याची पद्धत
- शेतकऱ्याला सर्वात प्रथम Google Play Store वर जावे लागेल व E-Pik Pahani ई-पीक पाहणी (DCS) अँप Install करायचा आहे.
- अँप Install झाल्यावर तो Open करायचा आहे.
- आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील Photo आणि Media च्या Access साठी Permission मागेल त्यासाठी Allow वर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमच्या Mobile च्या Location साठी Permission द्यावे लागेल त्यासाठी While Using This App व क्लिक करावे लागेल.
- आत तुम्हाला फोटो आणि विडिओ साठी Permission द्यावे लागेल त्यासाठी While Using This App व क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे.
- तुमच्या विभागाची निवड केल्यावर Right Arrow वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला लॉगिन पद्धत निवडायची आहेत त्यासाठी तुम्हाला शेतकरी म्हणून लॉगिन करा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून पुढे जा बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका व गावाची निवड करायची आहे व Right Arrow वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे खाते शोधायचे आहे तुम्ही तुमचे पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक टाकून खाते शोधू शकता. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार माहिती भरा आणि शोध बटनावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदार निवड मध्ये तुमच्या खातेदाराची निवड करायची आहे आणि Right Arrow वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव व खाते क्रमांक दिसेल आता तुम्हाला तुमच्या खाते क्रमांकाची निवड करायची आहे आणि Right Arrow वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक दिसेल तुमचा मोबाईल क्रमांक योग्य असल्याची खात्री करून घ्या व तो योग्य असल्यास पुढे वर क्लिक करा (जर तुमचा मोबाईल क्रमांक चुकीचा असेल किंवा तो बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदला वर क्लिक करून तो बदलून घ्या.)
- आता तुम्हाला एक मेसेज दिसेल तुमची नोंदणी आधीच झालेली आहे. तुम्हाला पुढे जायचे आहे का? तुम्हाला होय वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव निवडायचे आहे आणि तुमचा सांकेतांक टाकायचा आहे. (जर तुम्ही तुमचा सांकेतांक नंबर विसरला असाल तर सांकेतांक विसरलास? वर क्लिक करा तुम्हाला तुमचा सांकेतांक दिसेल.)
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला पीक माहिती नोंदवा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला पिकाची विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि पुढे जा वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शेताचे २ छायाचित्रे काढायची आहेत. दोन्ही छायाचित्रे काढून झाल्यावर Right Arrow वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुम्ही भरलेली सर्व माहिती तसेच दोन्ही छायाचित्रे दिसतील. सर्व माहिती तपासून पहा व सर्व माहिती अचूक असल्यास मी घोषित करत आहे वर टिक करा आणि पुढे जा वर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमची माहिती अपलोड झाल्याचा एक मेसेज दिसेल (पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे.) त्यामध्ये ठीक आहे वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला पिकांची माहिती पाहा वर क्लिक करून तुम्हाला तुम्ही जी माहिती भरली आहे ती पहायची आहे.
नवीन मोबाईल अॅप मधील व पीक प्रक्रियेत झालेले बदल
१) पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून ५० मीटर च्या आत फोटो घेणे अनिवार्य.
२) पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक
३) शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरु होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबधित समस्या सोडविण्यासाठी सहाय्यक उपलब्ध असेल.