Lokmat Agro >स्मार्ट शेती > E Pik Pahani : ई पीक पाहणी अॅपच्या सहाय्याने कायम पड/चालू पड जमिनीची माहिती कशी भरायची?

E Pik Pahani : ई पीक पाहणी अॅपच्या सहाय्याने कायम पड/चालू पड जमिनीची माहिती कशी भरायची?

E Pik Pahani : How to fill permanent barren kand/cultivable on land information with E Pik Pahani mobile app? | E Pik Pahani : ई पीक पाहणी अॅपच्या सहाय्याने कायम पड/चालू पड जमिनीची माहिती कशी भरायची?

E Pik Pahani : ई पीक पाहणी अॅपच्या सहाय्याने कायम पड/चालू पड जमिनीची माहिती कशी भरायची?

महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल आणि कृषी विभागांनी संयुक्तरीत्या राज्यात ई पीक पाहणी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल आणि कृषी विभागांनी संयुक्तरीत्या राज्यात ई पीक पाहणी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल आणि कृषी विभागांनी संयुक्तरीत्या राज्यात ई पीक पाहणी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजना तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर पोहचविण्याचा दृष्टीने सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.

पीक पाहणी अॅपच्या सहाय्याने कायम पड/चालू पड जमिनीची माहिती भरण्याची पद्धत

  1. शेतकऱ्याला सर्वात प्रथम Google Play Store वर जावे लागेल व E-Pik Pahani ई-पीक पाहणी (DCS) अॅप Install करायचा आहे.
  2. अॅप Install झाल्यावर तो Open करायचा आहे.
  3. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील Photo आणि Media च्या Access साठी Permission मागेल त्यासाठी Allow वर क्लिक करायचे आहे.
  4. आता तुम्हाला तुमच्या Mobile च्या Location साठी Permission द्यावे लागेल त्यासाठी While Using This App व क्लिक करावे लागेल.
  5. आता तुम्हाला फोटो आणि विडिओ साठी Permission द्यावे लागेल त्यासाठी While Using This App व क्लिक करावे लागेल.
  6. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे.
  7. तुमच्या विभागाची निवड केल्यावर Right Arrow वर क्लिक करायचे आहे.
  8. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला लॉगिन पद्धत निवडायची आहेत त्यासाठी तुम्हाला शेतकरी म्हणून लॉगिन करा वर क्लिक करायचे आहे.
  9. आता तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून पुढे जा बटनावर क्लिक करायचे आहे.
  10. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका व गावाची निवड करायची आहे व Right Arrow वर क्लिक करायचे आहे.
  11. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे खाते शोधायचे आहे तुम्ही तुमचे पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक टाकून खाते शोधू शकता. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार माहिती भरा आणि शोध बटनावर क्लिक करा.
  12. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदार निवड मध्ये तुमच्या खातेदाराची निवड करायची आहे आणि Right Arrow वर क्लिक करायचे आहे.
  13. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव व खाते क्रमांक दिसेल आता तुम्हाला तुमच्या खाते क्रमांकाची निवड करायची आहे आणि Right Arrow वर क्लिक करायचे आहे.
  14. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक दिसेल तुमचा मोबाईल क्रमांक योग्य असल्याची खात्री करून घ्या व तो योग्य असल्यास पुढे वर क्लिक करा (जर तुमचा मोबाईल क्रमांक चुकीचा असेल किंवा तो बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदला वर क्लिक करून तो बदलून घ्या.)
  15. आता तुम्हाला एक मेसेज दिसेल तुमची नोंदणी आधीच झालेली आहे. तुम्हाला पुढे जायचे आहे का? तुम्हाला होय वर क्लिक करायचे आहे.
  16. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव निवडायचे आहे आणि तुमचा सांकेतांक टाकायचा आहे. (जर तुम्ही तुमचा सांकेतांक नंबर विसरला असाल तर सांकेतांक विसरलास? वर क्लिक करा तुम्हाला तुमचा सांकेतांक दिसेल.)
  17. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला कायम पड/चालू पड निवडा वर क्लिक करावे लागेल.
  18. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली पड/चालू पड सर्व माहिती भरावयाची आहे आणि Right Arrow वर क्लिक करायचे आहे.

अशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी अंतर्गत पड/चालू पड ची नोंद केली जाईल.

अधिक वाचा: E-Peek Pahani : नवीन ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपमध्ये कशी कराल पीक पाहणी? वाचा सविस्तर

Web Title: E Pik Pahani : How to fill permanent barren kand/cultivable on land information with E Pik Pahani mobile app?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.