Join us

मधुमक्षिकापालन हा कृषिपूरक व्यवसाय करून कमवा अधिकच उत्पन्न; योजनेसाठी आजच नोंदणी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:04 IST

Madhukranti Yojana राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषध वनस्पती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात मधमाशा पालकांसाठी राष्ट्रीय मधुमक्षिकापालन आणि मध अभियान राबविले जात आहे.

राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषध वनस्पती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात मधमाशा पालकांसाठी राष्ट्रीय मधुमक्षिकापालन आणि मध अभियान राबविले जात आहे. यासाठी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. 

ग्रामीण भागात मधमाशीपालनातून रोजगाराच्या संधी तयार होत आहेत. मधुमक्षिकापालन हा कृषिपूरक व्यवसाय असून, त्यापासून शाश्वत उत्पन्न मिळू शकते.

विविध वृक्ष आणि पिकांच्या परागीभवनामध्ये मधमाश्यांचा मोठा वाटा आहे. पीक उत्पादन वाढविण्यासाठीदेखील मधुमक्षिकापालन अत्यंत आवश्यक आहे. अन्न साखळीमध्ये मधमाश्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

प्रति वसाहत ८ किलो मध आग्या माश्यांपासून सर्वांत जास्त मथ मिळतो. सातेरी मथमाश्यांपासून प्रति वसाहत ६ ते ८ किलो मथ मिळतो. फुलोरी माशी लहान असते. त्यांच्यापासून कमी मध मिळतो. त्यांच्या प्रत्येक वसाहतींमागे अंदाजे २०० ते २०० ग्रॅम मध उत्पादन होते. मधमाशीपालनासाठी सातेरी व मेलीफेरा या जातीच्या मधमाश्यांचे संगोपन केले जाते.

मधमाशीपालनाचे फायदे ● शुद्ध मध, परागकण, मेणाचे उत्पादन मिळते. ● शेतालगत/बांधालगत मधुमक्षिकापालन केल्यास पिकांच्या उत्पादनात सव्वा ते दीड पटीने वाढ होते. ● शेतीपूरकव्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढते, रोजगाराची संधी वाढते. 

मधाचे फायदे ● शरीरास ऊर्जा देणारा, प्रतिकार शक्त्ती देणारा नैसर्गिक अन्नघटक. ● स्नायूंना बळकटी मिळते.● सर्दी, खोकला, कफ, दमा या विकारांवर उपयुक्त. ● मध उत्तम अॅन्टिबायोटिक आणि अॅन्टिसेप्टिक म्हणून काम करतो.

काय काय आवश्यक?मधुमक्षिका पेट्यांचे स्थलांतर करता येणार आहे. मधुक्रांती पोर्टलवर नोंदणीसाठी आधार कार्ड, अद्ययावत भ्रमणध्वनी क्रमांक (आधार क्रमांकाशी जोडलेला), मधुमक्षिका पालनासंबंधी तपशील, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत, मधुमक्षिका पालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. 

येथे करा नोंदणी! कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्लीअंतर्गत विकसित केलेल्या madhukranti.in/nbb या मधुक्रांती पोर्टलवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करायची आहे.

अधिक वाचा: Hirvalichi Khate : हिरवळीचे खते जमिनीत नेमकी कधी आणि कशी गाडली पाहिजेत? वाचा सविस्तर

टॅग्स :शेतकरीशेतीपीकव्यवसायकृषी योजनाकेंद्र सरकारराज्य सरकारऑनलाइनआधार कार्ड