मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राने (बीएआरसी) ट्रॉम्बे पिकाचे आठ नवीन वाण शेतकऱ्यांना समर्पित करून कृषी क्षेत्रात नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यात असलेली आपली अग्रणी भूमिका पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
किरणोत्सार-आधारित उत्परिवर्तन प्रजनन तंत्राचा वापर करून विकसित केलेले हे नवीन वाण आहे. हे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येईल असे कोणत्याही तापमानात वाढेल असे अनुवांशिकरित्या सुधारित नसलेले (नॉन-जीएमओ) पीक वाण संपूर्ण भारतातील शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहेत.
या वाणांमध्ये पाच तृणधान्ये आणि तीन तेलबियांचा समावेश आहे. त्या राज्य कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने विविध कृषी परिस्थितीनुसार तयार केल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, अन्न आणि पोषण सुरक्षा वाढवणे आणि भारताच्या कृषी उद्दिष्टांशी जुळवून घेणे यासाठी बीएआरसीच्या महत्त्वपूर्ण योगदानावर अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी कार्यक्रमात भर दिला.
पिकांचे हे नवीन प्रकार उपलब्ध होणे म्हणजे कृषी विज्ञानाच्या प्रगतीसाठी अणुऊर्जा विभाग आणि राज्य कृषी विद्यापीठांच्या भागीदारीच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी सांगितले. या सहकार्यांचे उद्दिष्ट विशिष्ट ठिकाणी, सुधारित पीक वाणांचे उत्पादन करणे आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चांगल्या पद्धतीने अन्न सुरक्षा देऊ शकतील, असे ते म्हणाले.
ही पिके लवकर येतात, रोगांचा उत्तम प्रतिकार करतात, कुठल्याही हवामानात घेता येतात, क्षार स्थितीत तग धरू शकतात आणि अधिक उत्पादन देत असल्यामुळे हे वाण शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे बीएआरसीचे संचालक विवेक भसीन यांनी सांगितले. बीएआरसी स्थापनेचे ७० वे वर्ष साजरे करत असताना एकूण ७० पीक जाती भारतातील शेतकरी आणि लोकांना समर्पित केल्या आहेत.
नवीन पिकांच्या जातींचा तपशील
अ) गहू
भारताच्या गव्हाच्या उत्पादनाला वाढत्या तापमानामुळे, विशेषतः धान्य भरण्याच्या अवस्थेत आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रथमच बीएआरसीने गव्हाचे वाण विकसित केले आहे.
१) ट्रॉम्बे जोधपूर गहू-153 (TJW-153)
जोधपूर कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने राजस्थानसाठी विकसित केलेले TJW-153 हे वाण उष्णतेत तग धरू शकते. अति उष्णतेचा ताण असूनही स्थिर उत्पादन मिळते. उत्पादनात लक्षणीय घट करणाऱ्या ब्लास्ट आणि पावडर बुरशी सारख्या बुरशीजन्य रोगांना अटकाव करते. राजस्थानच्या रखरखीत परिस्थितीत आदर्श ठरावे असे हे वाण आहे.
२) ट्रॉम्बे राज विजय गहू-155 (TRVW-155)
राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठ, ग्वाल्हेरने मध्य प्रदेशासाठी विकसित केलेल्या या जातीमध्ये जस्त आणि लोहाचे प्रमाण अधिक आहे. या गव्हाच्या पिठापासून उत्तम चपात्या बनतात. ब्लास्ट आणि पावडर बुरशी यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिकार करणारे पीक.
ब) तांदूळ
भारतातील तांदळाच्या जाती विविधतेने समृद्ध आहेत परंतु अनेकदा उत्पादनात मागे पडतात. बीएआरसीने विकसित केलेल्या तांदळाच्या नवीन जाती या आव्हानांवर मात करतात.
१) बौना लुचाई-सीटीएलएम
छत्तीसगडसाठी आयजीकेव्ही, रायपूरसह विकसित केलेल्या लोकप्रिय लुचाई जातीचे उत्परिवर्तन. बाउना लुचाई हे एक छोटे लवकर परिपक्व होणारे वाण आहे ज्यामध्ये तगून राहण्याची प्रतिकारशक्ती आहे (पाऊस किंवा वाऱ्याने ते तुटत नाही), मऊ-शिजण्याची गुणवत्ता कायम ठेवते आणि मूळ पिकापेक्षा ४०% जास्त उत्पन्न देते.
२) संजीवनी
लायचा तांदूळ जातीपासून बनवलेला संजीवनी उपचारात्मक आणि औषधी गुणधर्मांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ३५० पेक्षा जास्त फायटोकेमिकल्सने समृद्ध असून रोग प्रतिकारशक्ती आणि अँटिऑक्सिडंट प्रतिसाद वाढवतो. छत्तीसगडसाठी आयजीकेव्ही, रायपूरच्या सहकार्याने विकसित केलेला हा तांदूळ आरोग्य-वर्धक तांदूळ वाणांची वाढत्या मागणी पूर्ण करतो.
३) ट्रॉम्बे कोकण खारा
महाराष्ट्राच्या क्षारयुक्त किनारपट्टीच्या जमिनीसाठी तयार केलेली, ही जात क्षारयुक्त परिस्थितीत १५% अधिक धान्य उत्पादन मिळवते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या सहकार्याने ही तांदळाची जात विकसित केली असून पूर्वीच्या खाऱ्या जमिनीमुळे लागवड होऊ न शकणाऱ्या जमिनीत याची लागवड करता येते.
क) तेलबिया
भारत सध्या आपल्या देशांतर्गत तेलबियांच्या मागणीपैकी केवळ ४०-४५% मागणी पूर्ण करतो. सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी, बीएआरसीने मोहरी, तीळ आणि भुईमूगाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती तयार केल्या आहेत.
१) ट्रॉम्बे जोधपूर मोहरी-2 (टीजेएम -2)
राजस्थानमधील जोधपूर कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केलेले, टीजेएम-२ विद्यमान वाणांच्या तुलनेत ४०% तेलासह १४% अधिक उत्पादन देते. हे भुरी आणि तांबेरा यांसारख्या बुरशीजन्य रोगांना प्रतिबंध करते आणि शेतकऱ्यांना एक मजबूत पर्याय उपलब्ध करते.
२) ट्रॉम्बे लातूर तीळ -10 (टीएलटी -10)
गामा किरण विकिरण वापरून बीएआरसी ने विकसित केलेली तीळाची ही पहिली जात आहे. महाराष्ट्रासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली असून टीएलटी-१० ही जात २०% जास्त उत्पन्न देते आणि आकाराने मोठे आहेत.
३) छत्तीसगड ट्रॉम्बे मुंगफली (सीजीटीएम)
सीजीटीएम ही एक नवीन उत्परिवर्तीत भुईमूग जात असून आयजीकेव्ही, रायपूरच्या सहकार्याने ट्रॉम्बे ग्राउंडनट-88 (TG-88) म्हणून जारी करण्यात आली आहे. यात तेलाचे प्रमाण अधिक (४९%) असून ते पावसाळी आणि उन्हाळी अशा दोन्ही ऋतूंमध्ये बहरतात आणि छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना वैविध्य देतात.
४) बाउनालुचाई (छत्तीसगड ट्रॉम्बे लुचाई म्युटंट, सीटीएलएम)
लुचाई प्रजातीतील आकाराने बारीक आणि लवकर परिपक्व होणारा तांदूळ आहे. तो मऊ शिजण्याचा गुणधर्म टिकवून ठेवतो आणि मूळ लुचाई पेक्षा ४०% जास्त उत्पन्न देते.
TJW-153 गहू, GW-11 च्या तुलनेत लांबीला मोठा आहे. TJW-153 हे केवळ अधिक उत्पन्न देत नाही, तर उष्णता सहन करणारे, रोगप्रतिबंधक असून त्याची चपाती चांगली होते.