मका, ज्वारी या पिकावर येणारी अमेरिकन लष्करी अळी बाजरी पिकावर मागील ३ ते ४ वर्षापासून खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
नियंत्रणाचे उपाय
१) मशागत पद्धत
• मशागत उन्हाळ्यात खोल नगरात करावी. (एप्रिल- मे).
• पिकाची फेरपालट करावी. मका घेतलेल्या शेतात पुढील पीक भुईमुग किंवा सूर्यफूल घ्यावे.
• बाजरीच्या बाजूने नेपियर गवताची लागवड सापळा पीक म्हणून करावी.
• बाजरीमध्ये आंतरपीक म्हणून मूग, उडीद, तूर या पिकांची लागवड करावी.
२) भौतिक पद्धत
• बाजरीची पेरणी झाल्यानंतर एकरी दहा पक्षी थांबे उभारावेत.
• बाजरीच्या पानावर दिसणारे अंडीपुंज व सुरवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
• किडीच्या सर्वेक्षणासाठी पेरणीनंतर पिक उगवून येण्यापूर्वी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत.
• मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत.
३) जैविक पद्धत
• बाजरी पिकामध्ये १५००० पीपीएम अझाडीरेक्टीन ५ मिलि/लि. पाणी या प्रमाणात सुरवातीच्या वाढीच्या काळात फवारणी करावी.
• प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक किटकनाशक नोमुरीया रिलाय ३ ग्रॅम किंवा मेटारायझीयाम अॅनिसोप्ली ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• ट्रायकोग्रामा (ट्रायकोकार्ड) १.५ ते १.६ लाख अंडी सोडावेत.
४) रासायनिक पद्धत
• पोंगा व्यवस्थित तयार होईल त्यावेळी माती किंवा राख + चुना यांचे ९:१ या प्रमाणात मिश्रण करून ते पोग्यात टाकावे.
• खालील किटक नाशकांची आलटून पालटून फवारणी बाजरीच्या पोग्यात जाईल या पद्धतीने करावी. थायोमिथोक्झाम १२.६% सीजी + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेड सी ५ मिली, किंवा स्पिनाटोरम ११.७% एससी ४ मिली किंवा क्लोरॅट्रीनीलीप्रोल १८.५% एस सी ४ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.