Join us

मकेवरील लष्करी अळी आता बाजरी पिकात कसे कराल नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 3:46 PM

मका, ज्वारी या पिकावर येणारी अमेरिकन लष्करी अळी बाजरी पिकावर मागील ३ ते ४ वर्षापासून खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

मका, ज्वारी या पिकावर येणारी अमेरिकन लष्करी अळी बाजरी पिकावर मागील ३ ते ४ वर्षापासून खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

नियंत्रणाचे उपाय१) मशागत पद्धत• मशागत उन्हाळ्यात खोल नगरात करावी. (एप्रिल- मे).• पिकाची फेरपालट करावी. मका घेतलेल्या शेतात पुढील पीक भुईमुग किंवा सूर्यफूल घ्यावे.• बाजरीच्या बाजूने नेपियर गवताची लागवड सापळा पीक म्हणून करावी.• बाजरीमध्ये आंतरपीक म्हणून मूग, उडीद, तूर या पिकांची लागवड करावी.

२) भौतिक पद्धत• बाजरीची पेरणी झाल्यानंतर एकरी दहा पक्षी थांबे उभारावेत.• बाजरीच्या पानावर दिसणारे अंडीपुंज व सुरवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.• किडीच्या सर्वेक्षणासाठी पेरणीनंतर पिक उगवून येण्यापूर्वी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत.• मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत.

३) जैविक पद्धत• बाजरी पिकामध्ये १५००० पीपीएम अझाडीरेक्टीन ५ मिलि/लि. पाणी या प्रमाणात सुरवातीच्या वाढीच्या काळात फवारणी करावी.• प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक किटकनाशक नोमुरीया रिलाय ३ ग्रॅम किंवा मेटारायझीयाम अॅनिसोप्ली ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.• ट्रायकोग्रामा (ट्रायकोकार्ड) १.५ ते १.६ लाख अंडी सोडावेत.

४) रासायनिक पद्धत• पोंगा व्यवस्थित तयार होईल त्यावेळी माती किंवा राख + चुना यांचे ९:१ या प्रमाणात मिश्रण करून ते पोग्यात टाकावे.• खालील किटक नाशकांची आलटून पालटून फवारणी बाजरीच्या पोग्यात जाईल या पद्धतीने करावी. थायोमिथोक्झाम १२.६% सीजी + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेड सी ५ मिली, किंवा स्पिनाटोरम ११.७% एससी ४ मिली किंवा क्लोरॅट्रीनीलीप्रोल १८.५% एस सी ४ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.

टॅग्स :बाजरीकीड व रोग नियंत्रणपीकशेतीशेतकरी