Join us

Falmashi : वेलवर्गीय भाजीपाला पिकातील फळमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 3:17 PM

फळमाशी विशेषतः कारले, तोंडली, काकडी, टरबूज, भोपळा, दोडका इत्यादी पिकांचे नुकसान करते.

फळमाशी विशेषतः कारले, तोंडली, काकडी, टरबूज, भोपळा, दोडका इत्यादी पिकांचे नुकसान करते.ओळखप्रौढ माशी घरमाशीच्या आकाराची, फिकट तपकिरी रंगाची असते, तिचे पाय पिवळे असतात आणि पंख पारदर्शक असून त्यावर काळे ठिपके असतात.

नुकसान करण्याची पद्धती- मादी माशी आपल्या अंडनिक्षेपकाच्या सहाय्याने पांढरी, दंडगोलाकार अंडी फळाच्या सालीखाली समूहाने घालते.अंड्यातून बाहेर येणाऱ्या अळ्यांना पाय नसतात.- त्यांची शरीरे पुढील टोकाला बारीक आणि मागच्या टोकाला जाड असतात.त्या फळ पोखरतात आणि फळाचा गर खातात.त्यामुळे फळे कुजतात आणि शेवटी खराब झालेली फळे गळतात.खराब झालेल्या फळातून अळ्या बाहेर येतात आणि मातीत कोष बनवतात.- ही कीड उष्ण हवामानात जास्त सक्रिय असते. या किडीचा एप्रिल-मे महिन्यात जास्त प्रादुर्भाव आढळतो.

एकात्मिक व्यवस्थापन१) शेतातील तणांचा वेळीच बंदोबस्त करावा.२) पिकाचे नियमित सर्वेक्षण करून रसशोषक किडीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष ठेवावे.३) रोगग्रस्त पाने आणि फळे हाताने गोळा करून नष्ट करावीत.४) निंबोळी अर्काची (४%) फवारणी करावी.५) उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करावी. पिकांची फेरपालट करावी आणि शेतातील व बांधावरील तणांचा बंदोबस्त करावा. ६) 'मिथाईल युजेनॉल' हे आमिष असलेले रक्षक सापळे प्रति हेक्टरी ५ या पद्धतीने लावावेत.७) निंबोळी पेंड २५० किलो प्रति हेक्टर जमिनीत मिसळावी.८) फळे लागण्याच्या कालावधीत झाडांच्या भोवतीची माती थोडी उकरावी त्यामुळे फळमाशीचे कोष नष्ट होतील.९) प्रौढ भुंगेरे किंवा अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.१०) प्रादुर्भावग्रस्त फळे काढून नष्ट करावी.११) नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळावा.१२) मित्र कीटकांचे संवर्धन करावे.

अधिक वाचा: Kakadi Lagwad : काकडी लागवडीचे नियोजन करताय? लागवडीसाठी महत्वाच्या टिप्स

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणभाज्यापीकशेतकरीशेती