Lokmat Agro >स्मार्ट शेती > Farmer id : शेतकऱ्यांनो फार्मर आयडी काढा; नाहीतर यापुढे मिळणार नाही या गोष्टींचा लाभ

Farmer id : शेतकऱ्यांनो फार्मर आयडी काढा; नाहीतर यापुढे मिळणार नाही या गोष्टींचा लाभ

Farmer id : Farmers, get your Farmer ID; otherwise you will no longer get these benefits | Farmer id : शेतकऱ्यांनो फार्मर आयडी काढा; नाहीतर यापुढे मिळणार नाही या गोष्टींचा लाभ

Farmer id : शेतकऱ्यांनो फार्मर आयडी काढा; नाहीतर यापुढे मिळणार नाही या गोष्टींचा लाभ

ज्या शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घेतला नाही तर भविष्यात कृषि विषयक कोणत्याही अनुदानाच्या योजनांचा लाभ मिळणे कठीण जाणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घेतला नाही तर भविष्यात कृषि विषयक कोणत्याही अनुदानाच्या योजनांचा लाभ मिळणे कठीण जाणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच हंगामी पीक माहिती संच व भू संदर्भीय भूभाग माहिती संच निर्मिती म्हणजेच अॅग्रीस्टॅक या क्रांतिकारी संकल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली आहे.

कृषी क्षेत्रासाठी सर्वसामावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. या संकल्पनेद्वारे शेतकरी ग्राहक विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते व यामधून शेतीच्या प्रक्रियेतील माहिती अचूक व पारदर्शकपणे मिळते.

याद्वारे शेतकऱ्याची व त्याच्या शेत जमिनीची ओळख पटविणार व शेतकऱ्यास अद्वितीय शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) मिळणार आहे.

अॅग्रीस्टॅक उपक्रम हा आपल्या शेतीचे भविष्य बदलणारी एक नवीन प्रणाली असून शेतकरी ओळख क्रर्माक ही एक जादुई डिजिटल चावी आहे ज्या चावी द्वारे शेतकऱ्यास अनेक संधीचे दरवाजे उघडते.

अॅग्रीस्टॅक योजनेचे शेतकऱ्यांसाठी काय होणार फायदे?
• शेतकऱ्याची व त्याच्या शेत जमिनीची ओळख पटविणार व शेतकऱ्यास अव्दितीय शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) मिळणार .
• शेतकऱ्यांना सर्व कृषी योजनांचा लाभ मिळण्यामध्ये सुलभता.
• PM-Kisan योजनेतील आवश्यक अटी पुर्ण करून शेतकऱ्यास लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता.
• PM-Kisan योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थीचा समावेश.
• पिक कर्जासाठी किसान क्रेडीट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व इतर कृषी कर्ज उपलब्धतेसाठी सुलभता.
• पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाईसाठी शेतक-यांचे सर्वेक्षणामध्ये सुलभता.
• किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल.
• शेतकऱ्यांना सेवा देणाऱ्या यंत्रणांना सदर सेवेसाठी सुलभता.
• शेतकऱ्यांना वेळेवर कृषि विषयक सल्ले उपलब्ध होणे, विविध संस्थांना शेतकऱ्यांस संपर्क करणेच्या संधीमध्ये वाढ.

शेतकरी ओळख क्रमांकासाठी काय आवश्यक आहे?
• शेतकऱ्याचा आधार नंबर.
• आधार संलग्न मोबाईल नंबर.
• शेतजमिनिचे खाते नंबर.

शेतकरी ओळख क्रमांकासाठी कोणाकडे संपर्क करावा?
• नागरी सुविधा केंद्र (CSC)
• संबंधित गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)/कृषि सहायक/ग्राम विकास अधिकारी.

केवळ दोनच मिनिटात मिळवा शेतकरी ओळख क्रमांक
जर का अजूनही फार्मर आयडी आपण निर्माण केला नसेल तर आजच आपले आधारकार्ड व आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाईल क्रमांक तसेच शेतजमिनिचे खाते नंबर घेऊन नजिकच्या नागरी सुविधा केंद्राशी संपर्क करा व आपला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करून घ्या.

शेतकरी बांधवांनो हे लक्षात घ्या
ज्या शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घेतला नाही तर भविष्यात कृषि विषयक कोणत्याही अनुदानाच्या योजनांचा लाभ मिळणे कठीण जाणार आहे.

अधिक वाचा: Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर

Web Title: Farmer id : Farmers, get your Farmer ID; otherwise you will no longer get these benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.