महाराष्ट्रातील जळगावला केळी उत्पादनाचे माहेरघर समजले जाते. येथून चांगल्या प्रतीची केळी निर्यात केली जातात. त्याचपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, कोल्हापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही आता मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होत आहे. बाजारात वेगवेगळ्या जातीची केळी सध्या उपलब्ध आहेत पण लाल रंगाची केळी आता बाजारात उपलब्ध होऊ लागली असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या केळीमुळे नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
दरम्यान, सध्या भारताच्या दक्षिणेकडून राज्यामध्ये लाल केळीचे उत्पादन होत असून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. या केळीला वेलची केळी म्हणूनही ओळखले जाते. तर यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे या केळीला मोठ्या प्रमाणात मागणीसुद्धा आहे. पण महाराष्ट्रात या केळीचे उत्पादन घेतले जात नाही. योग्य अभ्यास करून या केळीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
आरोग्यदायी फायदेलाल केळीमध्ये यामध्ये वैद्यकीय गुणधर्म जास्त आहेत. इतर केळींच्या तुलनेत कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हाडांसाठी ही खूप चांगली केळी आहेत. याच गुणधर्मामुळे या केळीला परदेशात मागणी असून दरही चांगला मिळतो. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी यामधून चांगेल उत्पन्न घेता येऊ शकते.
उत्पन्नया केळीच्या एका घडाचे वजन साधारण १५ ते २० किलो असते. योग्य व्यवस्थापन, खते, पाणी यांचे नियोजन केले तर घडांचे वजन ३० किलोपर्यंतसुद्धा जाते. त्याचबरोबर एका एकरात किमान १५ टन केळी उत्पादन होऊ शकते. औषधी गुणधर्म आणि मागणी असल्यामुळे या केळीची लागवड शेतकऱ्यांना फायद्याची ठरू शकते.