योजनेचे महत्व देशातील सर्व अल्प व अत्यल्प भुधारक (२ हेक्टरपर्यंत लागवडीलायक शेतजमीन) शेतकऱ्यांना त्यांच्या वृध्दापकाळात निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे.
योजनेचा उद्देशअल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना त्यांच्या वृध्दापकाळात निवृत्ती वेतन मिळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
योजनेची व्याप्ती संपूर्ण राज्य
योजनेचे स्वरूप■ प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही संपूर्णपणे केंद्र पुरस्कृत योजना असून १८ ते ४० वर्षे वयोगटातील अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजना असून यामध्ये रू. ३०००/- प्रति महिना इतकी रक्कम त्याचे वय ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर निश्चित मिळण्याची तरतुद करण्यात आलेली आहे.■ या योजनेअंर्तगत पात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांनी त्यांचे वयोमानानुसार रक्कम रू. ५५/- ते २००/- इतका मासिक हफ्ता वयाचे ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत पेन्शन फंडामध्ये जमा करावयाचा आहे.■ शेतकऱ्यांनी पेन्शन फंडामध्ये जमा केलेल्या मासिक हप्त्याइतकीच रक्कम केंद्र शासन संबंधित शेतकऱ्यांच्या पेन्शन फंडामध्ये जमा करणार आहे.
लाभार्थी पात्रतेचे निकष■ या योजनेकरीता १८ ते ४० वर्षे वयोगटातील अल्प व अत्यल्प भुधारक पात्र लाभार्थ्यांव्यतिरिक्त खालील शेतकरी अपात्र असतील.■ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एन.पी.एस.), कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन स्किम यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी या योजनेस अपात्र असतील.■ कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (पी.एम.एस.वाय.एम.) मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र असतील.■ कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री लघू व्यापारी मानधन योजना (पी.एम.एल.व्ही.एम.) मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र असतील.■ उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी लाभार्थी खालीलप्रमाणे प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र नसतील.१) जमीन धारण करणारी संस्था.२) संवैधानिक पद धारण करणारी/केलेली आजी/माजी व्यक्ती.३) आजी/माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालिकेचे महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष.४) केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/कर्मचारी, शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी/कर्मचारी (चतुर्थ श्रेणी / गट-ड वर्ग कर्मचारी वगळून).५) मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती.६) नोंदणीकृत व्यावसायीक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (सी.ए.), वास्तुशास्त्रज्ञ (आर्कीटेक्ट) इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती.
कार्यान्वयीन यंत्रणाजीवन विमा निगम व सामाईक सुविधा केंद्र.
अर्ज कुठे कराल?सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र.