Lokmat Agro >स्मार्ट शेती > सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांना आंबा, काजू पिकांनी दिला मोठा हात

सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांना आंबा, काजू पिकांनी दिला मोठा हात

farmers in Sindhudurg got profit from Mango and cashew crops | सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांना आंबा, काजू पिकांनी दिला मोठा हात

सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांना आंबा, काजू पिकांनी दिला मोठा हात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात पिकांसह फळ पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्याला देशासह परदेशातही मोठी मागणी आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात पिकांसह फळ पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्याला देशासह परदेशातही मोठी मागणी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मंगेश वारंग, ओरोस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आदी विविध प्रकारची फळपिके शेतकऱ्याकडून उत्पादित केली जात आहेत. ही सर्व पिके घेत असली तरी जिल्ह्यात प्रामुख्याने आंबा आणि काजू मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्याला दरही चांगला मिळतो. ही फळे परदेशात मोठ्या प्रमाणात पाठविली जातात. आंबा व काजू ह्या दोन पिकांनी शेतकऱ्यांना मालामाल केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात पिकांसह फळ पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. जिल्ह्यात एकूण फळबागांचे क्षेत्र १ लाख ४४ हजार ५०२ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी देवगड, वेंगुर्ला. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी दोडामार्ग, तालुक्यात उत्पादनक्षम क्षेत्र अधिक आहे. जिल्ह्यात आंबा फळबागांचे क्षेत्र ३४ हजार २५० हेक्टरच्यावर असून, सर्वाधिक पेरा देवगड तालुक्यात आहे. काजू पिकाचे क्षेत्र ७२ हजार १४५ हेक्टरवर पसरले आहे. तसेच नारळ परत पिकाचे २० हजार ८४ हेक्टर क्षेत्र लाडवडीखाली आहे. त्याशिवाय फणस, केळी, चिकू, कोकम या फळपिकांचे क्षेत्रही लक्षणीय आहे..

■ जिल्ह्यात एकूण १ लाख ४४ हजार ५०२ हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत.
■ जिल्ह्यातील उत्पादित फळांची यूएसए, कॅनडा, श्रीलंका, दुबईसह इतरही देशांत निर्यात करण्याची किमया शेतकऱ्यांनी साधली आहे.
■ त्यापैकी काजू फळबागांचे क्षेत्र ७२ हजार १४५ हेक्टर सर्वाधिक असून, दोडामार्ग वेंगुर्ला कणकवली तालुक्यात काजूची लागवड अधिक प्रमाणात आहे.
■ त्यात आंबा, काजू या पिकांची निर्यात परराज्यांत नियमित होत असते.

गेल्या काही वर्षांपासून मी काजू फळपिकांचे उत्पादन घेत आहे. या फळपिकातून कमी खर्चात शेतकयांना या फळपिकाचा मोठा अधिक उत्पन्न मिळते. परिसरातील फायदा होत आहे.
वैभव परब, शेतकरी

मागील काही वर्षांपूर्वी आंबा लागवड केली आहे. पारंपरिक पिकांच्या तुलनेत या पिकातून कमी क्षेत्रात लाखोंचे उत्पन्न घेणे शक्य होत आहे. परिसरातील इतरही शेतकरी या पिकाकडे वळत आहेत.
-संदेश लोके, शेतकरी

Web Title: farmers in Sindhudurg got profit from Mango and cashew crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.