Lokmat Agro >स्मार्ट शेती > शेतकऱ्यांनो परतीचा पाऊस सुरु झालाय वीज पडण्याची भीती कशी घ्याल काळजी

शेतकऱ्यांनो परतीचा पाऊस सुरु झालाय वीज पडण्याची भीती कशी घ्याल काळजी

Farmers, the rains have started again, how can you take care of the fear of lightning | शेतकऱ्यांनो परतीचा पाऊस सुरु झालाय वीज पडण्याची भीती कशी घ्याल काळजी

शेतकऱ्यांनो परतीचा पाऊस सुरु झालाय वीज पडण्याची भीती कशी घ्याल काळजी

परतीच्या मान्सूनचा पाऊस सुरू झाला असून, अनेकवेळा विजाही कडाडत असतात. अनेकवेळा घरातील विद्युत उपकरणे जळण्याचे प्रकार घडत असतात. क्वचित प्रसंगी अंगावर वीज पडून काही जणांचा मृत्यू होतो.

परतीच्या मान्सूनचा पाऊस सुरू झाला असून, अनेकवेळा विजाही कडाडत असतात. अनेकवेळा घरातील विद्युत उपकरणे जळण्याचे प्रकार घडत असतात. क्वचित प्रसंगी अंगावर वीज पडून काही जणांचा मृत्यू होतो.

शेअर :

Join us
Join usNext

परतीच्या मान्सूनचा पाऊस सुरू झाला असून, अनेकवेळा विजाही कडाडत असतात. अनेकवेळा घरातील विद्युत उपकरणे जळण्याचे प्रकार घडत असतात. क्वचित प्रसंगी अंगावर वीज पडून काही जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

अनेक जण वीज चमकत असताना झाडांचा आसरा घेतात. हे फार धोकादायक आहे. त्यामुळे तसे करू नये. वीज अंगावर पडून व्यक्ती दगावण्याच्या घटना इतर जिल्ह्यांत फार मोठ्या प्रमाणात घडत असतात. 

घरांवर वीज पडून नुकसान होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. तसेच शेतकरी शेतात काम करत असताना झाडाचा आडोसा घेतात. गुरांवर वीज पडून ती दगावण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

विजा चमकत असल्यास हे करु नका
• पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तत्काळ बंद करावा.
• विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका. दुचाकी, सायकल यावर असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी थांबावे.
• धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका.

विजा चमकत असल्यास हे करा
• आकाशात विजेचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी, तसेच नागरिकांनी तत्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
• पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तत्काळ पाण्यातून बाहेर यावे.
• जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट, अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवावा.
• तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही, याची काळजी घ्यावी.
• झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे. विजेचे खांब, टेलिफोन खांब, लोखंडी पाइप आदी वीजवाहक वस्तूंपासून दूर राहावे.

वीज पडल्यास प्राथमिक उपचार
• वीज पडल्यास प्राथमिक उपचारासाठी मुख्यतः हृदय व श्वसन प्रक्रियेत अडथळा येतो. त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी.
• तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.
• विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करून ठेवावीत.

Web Title: Farmers, the rains have started again, how can you take care of the fear of lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.