Lokmat Agro >स्मार्ट शेती > उन्हाळ्यात फळबागा जिवंत ठेवण्यासाठी करा हे सोपे पाच उपाय; वाचा सविस्तर

उन्हाळ्यात फळबागा जिवंत ठेवण्यासाठी करा हे सोपे पाच उपाय; वाचा सविस्तर

Follow these five simple steps to keep your fruit orchard alive in summer; Read in detail | उन्हाळ्यात फळबागा जिवंत ठेवण्यासाठी करा हे सोपे पाच उपाय; वाचा सविस्तर

उन्हाळ्यात फळबागा जिवंत ठेवण्यासाठी करा हे सोपे पाच उपाय; वाचा सविस्तर

यावर्षी पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात दिवसागणिक उन्हाळ्यातील तापमान वाढत आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाचे योग्य व्यवस्थापन करून उन्हाळ्यात आपल्या फळबागा जिवंत ठेवणे गरजेचे आहे.

यावर्षी पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात दिवसागणिक उन्हाळ्यातील तापमान वाढत आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाचे योग्य व्यवस्थापन करून उन्हाळ्यात आपल्या फळबागा जिवंत ठेवणे गरजेचे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

यावर्षी पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात दिवसागणिक उन्हाळ्यातील तापमान वाढत आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाचे योग्य व्यवस्थापन करून उन्हाळ्यात आपल्या फळबागा जिवंत ठेवणे गरजेचे आहे. पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून उन्हाळ्यात फळबागा वाचवू शकतो.

१) आच्छादनाचा वापर
जमिनीतून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग जमिनीवर आच्छादन करून कमी करता येतो. ही सर्वात सोपी पद्धत आहे. यासाठी फळबागेतील प्रत्येक झाडाजवळ सेंद्रिय पद्धतीने ५ ते ६ सें.मी. जाडीचे उसाचे पाचट, पालापाचोळा, वाळलेले गवत, काडीकचऱ्याचे थर द्यावेत. यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास तसेच जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होऊन खताच्या खर्चात बचत होते. विशेषत: पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते. जमिनीतील ओलावा टिकून राहातो. याशिवाय आच्छादनामुळे मृद संधारण, जमिनीचे तापमान संतुलित राखणे, क्षारांचे प्रमाण कमी करणे, तणांचा बंदोबस्त करणे व मितीची संरचना सुधारणे इत्यादी प्रकारचे विशेष परिणाम दिसून येतात.

२) हलकी छाटणी करणे
झाडाच्या पानातील पाण्याचे उत्सर्जन कमी करण्यासाठी झाडावरील पानांची संख्या कमी असणे गणजेचे असते. त्यासाठी फळ झाडाची हालकी छाटणी करावी.

३) बाष्परोधकांचा वापर
पद्धतीमध्ये पानाचे पर्णरंध्रे बंद करणारे बाष्परोधक किंवा सूर्य किरणे परावर्तीत करणारे बाष्परोधक शेतकऱ्यांनी फळपिकामध्ये पर्णोत्सर्जन कमी करण्यासाठी वापरावे. त्यासाठी केओलीन पर्णरंध्रे बंद करणारे बाष्परोधकांचे सहाशे ते आठशे ग्रॅम १० लिटर पाण्यात द्रावण तयार करून १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.

४) वारारोधकाची उभारणी
वाऱ्यामुळे जमिनीतील बाष्पीभवन आणि झाडाच्या पानातील पाण्याचे उत्सर्जन जास्त होत असते. त्यामुळे बागेच्या पश्‍चिम व दक्षिण दिशांना वारारोधक झाडांची लागवड करावी. उदा. शेवगा, सुरू, जांभुळ, करवंद इत्यादी झाडे लावावीत.

५) मडका सिंचन
पाण्याचे फारच दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी या पद्धतीचा उपयोग आपल्या बागा जिवंत ठेवण्यासाठी करावा. झाडाच्या वयानुसार मडकी वापरावीत. लहान फळझाडांच्या व कमी वयाच्या झाडांसाठी ५ लिटर क्षमतेची तर जास्त वय व मोठ्या झाडांसाठी १५ लिटर क्षमतेची मडकी वापरावीत. भर दुपारी झाडाखाली पडणाऱ्या सावलीवरून झाडाचे सावली क्षेत्र निश्‍चित करून दोन ते चार मडकी प्रति झाड ठेवावे. दर पंधरा दिवसाला मडक्यांची जागा बदलावी. निवडलेल्या मडक्याच्या तळाशी लहान छिद्रे पाडून त्यात कापडाची चिंधी बसवून सवली क्षेत्राच्या परिघावर ठेवावे व पाणी भरून झाकण ठेवावे.

प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक (कृषिविद्या)
दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय, दहेगाव, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर 

अधिक वाचा: शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय १ लाखाचे अनुदान; वाचा सविस्तर

Web Title: Follow these five simple steps to keep your fruit orchard alive in summer; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.