भाजीपाला पिकांमध्ये पाने, शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळ्या, वांग्यावरील शेंडे व फळ पोखरणारी अळी, भेंडीवरील शेंडे व फळ पोखरणारी अळी, टोमॅटोवरील फळे पोखरणारी अळी इ. आढळून येतात.
१) वांगी पिकावरील शेंडे आणि फळे पोखरणारी अळी कीड व्यवस्थापन- पुनर्लागवड करताना वांग्याची रोपे इमिडाक्लोप्रिड १० मिली प्रति १० लिटर पाण्याच्या द्रावणात अर्धा तास बुडवून नंतर लागवड करावी.- शेताच्या कडेने मका चवळी यांची लागवड करावी.- लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा कीटक प्रति हेक्टरी १ लाख या प्रमाणात ७ दिवसाचे अंतराने २-३ वेळा सोडावेत.- किडलेले शेंडे वेळोवेळी खुडून काढावेत आणि खोल खड्ड्यात गाडून टाकावेत.- शेतात एकरी ४० या प्रमाणात ल्युसी ल्युर कामगंध सापळे लावावेत. किडीचे प्रमाण १० टक्के पेक्षा जास्त असेल तर पुढीलप्रमाणे फवारणी करावी.- जैविक नियंत्रणात निंबोळी अर्क ५ टक्के, बी.टी. जीवाणू १० ग्रॅम १० लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारावे.- क्लोरोपायरीफॉस २० मिली किंवा इमामेक्टिन बेनझोएट ५ एस.जी. ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारावे.
२) भेंडी पिकावरील शेंडे व फळ पोखरणारी अळीकीड व्यवस्थापन- भेंडी उगवणीनंतर ४०-४५ दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा कीटक प्रति हेक्टरी १ लाख या प्रमाणात ७ दिवसाचे अंतराने २-३ वेळा सोडावेत.- किडलेले शेंडे वेळोवेळी खुडून काढावेत आणि खोल खड्ड्यात गाडून टाकावेत.- किडलेली फळे काढून नष्ट करावेत. किडीचे प्रमाण ५ टक्के पेक्षा जास्त असेल तर पुढीलप्रमाणे फवारणी करावी.- निंबोळी अर्क ५ टक्के, बी.टी. जिवाणू १० ग्रॅम १० लिटर पाणी, क्लोरोपायरीफॉस २० मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ एस.जी. ४ ग्रॅम १० लिटर पाण्यातून नवीन किडनाशकांमध्ये स्पीनोसॅड ४५ एससी. ५ मिली १० लिटर पाण्यातून साध्या हातपंपाने फवारावे.
३) फळे पोखरणारी अळी कीड व्यवस्थापनअ) आंतरपिके/सापळा पिके- पुर्नलागवडीचे वेळी मुख्य पिकाच्या कडेने मका आणि चवळी लावावी.- टोमॅटोच्या प्रत्येक १५ ओळीनंतर २ ओळी झेंडूच्या लावाव्या.- झेंडूची लागवड टोमॅटो लागवण्यापूर्वी १५ ते २० दिवस अगोदर करावी म्हणजे झेंडूला कळ्या लवकर लागून कीड झेंडूकडे अगोदर जाईल.- त्याचवेळी झेंडूवर किडनाशकाची फवारणी करुन टोमॅटोकडे जाणारी फळे पोखरणारी अळीचे प्रमाण कमी करता येईल.
ब) जैविक नियंत्रण- लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी शेतात ट्रायकोग्रामा चिलोनिस किटक प्रति हेक्टरी १ लाख या प्रमाणात ७ दिवसाचे अंतराने २-३ वेळा सोडावेत.- हे कीटक फळे पोखरणाऱ्या किडींच्या पतंगाच्या अंड्यात स्वतःची अंडी घालतात. त्यामुळे फळे पोखरणारी कीड अंडी अवस्थेत नष्ट होते.- फळे पोखरणारी अळीस विषाणूपासून रोग निर्माण होतात. तेव्हा असे विषाणू प्रयोग शाळेत वाढवून त्यांचे द्रव स्वरुपात उपयोग केला जातो.- हेलिओथिस न्यूक्लिअर पॉलिहेड्रोसीस व्हायरस (एच.ए.एन. पी.व्ही.) या नावाने हे विषाणू ओळखले जातात.- एच.ए.एन.पी.व्ही. २०० मि.ली एकरी २०० लिटर पाण्यातून संध्याकाळचे वेळी साध्या हातपंपाने फवारावे.- सेंद्रिय घटकाचा वापर करुन नियंत्रण यामध्ये वनस्पतीजन्य कीडनाशकांचा वापर करता येतो. उदा. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.- अथवा बाजारात उपलब्ध असलेले निमार्क १०,००० पीपीएम २० मिली किंवा निमार्क १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.