कांदा पिकवणाऱ्या राज्यांत क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्रप्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. देशाचे २५ टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात आहे.
नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, धुळे हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. मात्र या महत्वाच्या पिकात बाजारभावातील सततच्या चढउतारामुळे कायमस्वरुपी अस्थिरता आढळते. यासाठी साठवणूक हा चांगला पर्याय ठरू शकतो.
कांदा सावलीत साठविण्याचे फायदे
- कांदा सावलीत वाळवला तर या काळामध्ये कांद्यामध्ये साठलेली उष्णता हळूहळू बाहेर पडून कांद्याच्या बाहेरील सालीमधील पाणी पुर्णपणे आटून त्यांचे पापुद्र्यात रुपांतर होते व त्याला आपण कांद्याला पत्ती सुटणे असे म्हणतो.
- हे पापुद्रे किंवा पत्ती साठवणुकीत कवच कुंडलाचे काम करुन कांद्याला सर्व प्रकारच्या नुकसानीपासून संरक्षण देतात.
- अतिरिक्त उष्णता व पाणी निघून गेल्यामुळे असा कांदा सडत नाही.
- कांद्याभोवती पापुद्र्याचे आवरण तयार झाल्यामुळे वातावरणातील आर्द्रता व रोगकिडीपासून त्यांचा बचाव होतो.
- साठवणुकीत बाष्पीभवन रोखल्यामुळे वजनातील घट रोखली जाते.
- तसेच कांद्याची श्वसनाची क्रिया मंदावल्यामुळे कांदा सुप्त अवस्थेत जातो व त्याला ४-५ महिने मोड फुटत नाहीत.
- या सर्व साठवणुकीमधील फायद्यांसाठी कांदा सावलीत पातळ थर देवून २१ दिवसांकरिता वाळविणे अत्यंत महत्वाचे आहे.
अधिक वाचा: कांद्याच्या वजनात घट होऊ नये म्हणून कांदा काढणी व कापणी करताना हे नक्की करा