फल्वीक अॅसीड हा ही एक सेंद्रिय पदार्थ आहे. ह्युमिक अॅसीड वर विविध अम्लाची प्रक्रिया करून फल्वीक अॅसीड तयार होते. ऑस्ट्रेलियाचे कृषिशास्त्रज्ञ डॉ. ग्रॅम सिट फल्वीक ॲसिडला सेकंड सन (दुसरा सुर्य) असे संबोधतात.
कारण यामुळे प्रकाश संश्लेषनाचा वेग वाढतो. फल्वीक अॅसीड विविध खताचे चिलेशन (आस्तरीकरण) करणेसाठी वापरता येते. फल्वीक अॅसीड चॉकलेटी रंगाचे पावडर व द्रव स्वरूपात मिळते.
फल्वीक अॅसीड द्रावण करण्यासाठीचे साहित्य
२०० लिटरचा प्लॉस्टिक ड्रम
३ किलो फल्वीक अॅसीड
२०० लिटर पाणी
फल्वीक अॅसीड द्रावण तयार करण्याची कृती
ड्रम मध्येः ३ किलो फल्वीक अॅसीड १९५ लिटर पाणी मिसळून काठीने ढवळा लगेच द्रावण वापरण्यास योग्य होते.
शक्यतो जितक्या द्रावणाची आवश्यकता आहे. तेवढेच द्रावण करून लगेच वापरा.
फल्वीक अॅसीड द्रावण हे प्रकाश संश्लेषन क्रिया जलद करण्यास मदत करते.
फायदे
१) यामुळे मातीचा सामू नियंत्रित करता येतो.
२) याचा वापर वारंवार जमिनीतून केल्यामुळे जमीनीतील उपयुक्त सुक्ष्मजीवांची प्रामुख्याने उपयुक्त बुरशीची संख्या वाढते.
३) यामुळे जमीनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, खतांची ५०% बचत होते.
४) कमी सुर्यप्रकाशातही यामुळे प्रकाश संश्लेषनाचा दर वाढतो.
५) फवारणीतून याचा वापर केल्यास फळांची प्रत सुधारते.
फल्वीक अॅसीड द्रावण केव्हा वापरावे?
हे द्रावण फळभाज्या, पालेभाज्या, फळपिकांसाठी याचा वापर सर्व वाढीच्या अवस्थांमध्ये करता येतो.
१) रोप अवस्था
२) शाखीय वाढीची अवस्था
३) फुले येण्याची अवस्था
४) फळे येण्याची व पक्वतेची अवस्था
फल्वीक अॅसीड द्रावण किती व कसे वापरावे?
१) पिकाला एकरी १० लिटर फल्वीकअॅसीड द्रावण ड्रिप मधून किंवा पाट पाण्याने द्यावे.
२) फवारणी करताना ०.५ ग्रॅम फल्वीक अॅसीड किंवा १० मिली. फल्वीक अॅसीड द्रावण प्रती १ लिटर पाण्यात घेवून फवारणी करावी.
अधिक वाचा: Humic Acid घरच्या घरी ह्युमिक अॅसीड कसे बनवाल; किती व कसे वापराल?