गव्हाची पेरणी १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय.
या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. बागायती गव्हाची पेरणी सुद्धा उशिरा करता येते. परंतु वेळेवर पेरणी केलेल्या गव्हापेक्षा उत्पादन कमी येते.
बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यास हेक्टरी अडीच क्विंटल उत्पादन कमी येते व त्यामुळे १५ डिसेंबर नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.
पेरणीसाठी विविध वाण१) बागायती वेळेवर पेरणीकरीताएन आय ए ड्ब्ल्यू ३०१ (त्र्यंबक), एन आय ए ब्ल्यु ९१७ (तपोवन), एन आय ए ब्ल्यु २९५ (गोदावरी)
२) गहू पेरणी बागायती उशिरा पेरणीकरीताएन आय ए ब्ल्यु ३४, ए के ए ब्ल्यु ४६२७
३) जिरायत पेरणीकरिताएन आय डी ब्ल्यु १५ (पंचवटी), ए के डी ब्ल्यु ३९९७ (शरद)
४) कमी पाण्यात पेरणीकरितानिफाड ३४, एन आय ए ब्ल्यू १४१५ (नेत्रावती)
बियाणे आणि खत व्यवस्थापनहेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश व पेरणीनंतर ३ आठवड्यांनी खुरपणी केल्यानंतर उर्वरीत ६० किलो नत्र द्यावे.]
अधिक वाचा: Us Bene Prakriya : पूर्वहंगामी उसाची लागवड करायचीय कशी कराल बेणे प्रक्रिया