Lokmat Agro >स्मार्ट शेती > जिरॅनियम देतंय दुहेरी फायदा; सुगंधी व औषधी वनस्पती म्हणून कशी कराल लागवड

जिरॅनियम देतंय दुहेरी फायदा; सुगंधी व औषधी वनस्पती म्हणून कशी कराल लागवड

Geranium offers a double benefit; How to cultivate as an aromatic and medicinal plant | जिरॅनियम देतंय दुहेरी फायदा; सुगंधी व औषधी वनस्पती म्हणून कशी कराल लागवड

जिरॅनियम देतंय दुहेरी फायदा; सुगंधी व औषधी वनस्पती म्हणून कशी कराल लागवड

बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सामुहिक पद्धतीने याची लागवड करणे शक्य आहे. जिरॅनियमची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्षापर्यंत चांगल्याप्रकारे उत्पादन मिळते. या पिकाचा व्यवस्थापन खर्च इतर पिकांपेक्षा कमी आहे.

बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सामुहिक पद्धतीने याची लागवड करणे शक्य आहे. जिरॅनियमची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्षापर्यंत चांगल्याप्रकारे उत्पादन मिळते. या पिकाचा व्यवस्थापन खर्च इतर पिकांपेक्षा कमी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जिरॅनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला प्रक्रिया उद्योगासाठी चांगली मागणी आहे. जिरॅनियम पाल्यापासून तेल काढतात. तेलात जिरॅनियम आणि सिट्रोनेलॉल आहे. याचा वापर उपचार पद्धतीमध्ये होतो. तेलास सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर निर्मितीसाठी मागणी. कापणीनंतर उरलेल्या पालापाचोळ्यापासून खत निर्मिती.

बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन सामुहिक पद्धतीने याची लागवड करणे शक्य आहे. जिरॅनियमची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्षापर्यंत चांगल्याप्रकारे उत्पादन मिळते. या पिकाचा व्यवस्थापन खर्च इतर पिकांपेक्षा कमी आहे. 

जमीन
लागवडीसाठी मध्यम प्रतीची पाण्याचा चांगल्या प्रकारचा निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. हलक्या ते मध्यम जमिनीतही लागवड शक्य आहे. सुरवातीला नांगरणी केल्यानंतर दोनदा कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. त्यानंतर गादी वाफे बनवून लागवड करावी.

जाती
अलजीरियन, ट्युनिशिया, रीयूनियन, बोर्बन, हेमंती, बिपुली, कुंती, आय.आय.एच.आर. - ८, उटी,नर्मदा, इजिप्शियन आणि सिम-पवन इत्यादी.

रोपवाटिका
रोपे तयार करण्यासाठी फेब्रुवारी-मार्च आणि सप्टेंबर-ऑक्टोबरचा कालावधी योग्य आहे. लागवडीसाठी रोपे ४५ ते ६० दिवसांची असावीत. रोपांची काडी जेवढी जाड तेवढी ती रोपे चांगली असतात.रोपांची तंतुमय मुळे चांगल्याप्रकारे वाढलेली असावीत. 

लागवड
६०x६० सें. मी. किंवा ७५x६० सेंमी. अंतरावर करावी.

खत व्यवस्थापन
चांगल्याप्रकारे कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावे. प्रति हेक्टरी २०० किलो नत्र,३५ किलो स्फुरद आणि ३५ किलो पालाश द्यावे. लागवडीच्यावेळी २० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उर्वरित ८० टक्के नत्र लागवडीनंतर ३०, ४५, ६० आणि ७५ दिवसांनी समान हप्त्यात विभागून द्यावे.

आंतरमशागत
१५ ते २० दिवसांच्या अंतराने दोन खुरपण्या करून शेत तणविरहित ठेवावे. लागवड केल्यानंतर साधारणपणे १ ते १.५ महिन्यानंतर रोपांना भर द्यावी.

अधिक वाचा: आता हळद काढणीला येईल लवकर; करा या तंत्रज्ञानाने लागवड

पाणी व्यवस्थापन
सुरवातीचे म्हणजे पहिले पाणी लागवडीनंतर लगेच द्यावे. यामुळे रोपांची योग्य वाढ होते. रब्बी हंगामात साधारणपणे ७ ते ८ दिवसांनी आणि उन्हाळी हंगामात ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. खरीप हंगामात पावसाच्या अंदाजानुसार पाणी द्यावे. पीक वाढीच्या काळात पाण्याचा योग्य वापर करावा. दोन पाण्याच्या पाळ्यांमध्ये मोठा खंड पडू देऊ नये. तसेच गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर केल्यास मूळ कूज रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

काढणी
पानांचा थोडासा रंग हा फिक्कट पिवळसर होण्यास सुरवात झाल्यावर तसेच सुगंध हा गुलाबासारखा येण्यास सुरवात झाल्यावर कापणी करावी. लागवड केल्यानंतर दर चार महिन्यांनी विळ्याच्या साह्याने कापणी करावी लागते. कापणी केल्यानंतर पुन्हा लागवड करण्याची आवश्यकता नसते. हेच पीक तीन वर्षापर्यंत चालते.

उत्पादन
कधीकधी, ०.१% उत्पन्न मिळू शकते. तीनही कापणीतून प्रति हेक्टर ताज्या वनौषधीचे उत्पादन सुमारे ३० टन आहे, जे उर्ध्वपातनावर सुमारे २४ किलो तेल मिळते. मैदानी प्रदेशात मात्र, सुमारे ४० टन औषधी वनस्पती/हेक्टर/वर्ष उत्पादन मिळते ज्यातून ४० किलो तेल तयार होते. 

बी. जी. म्हस्के
सहाय्यक प्राध्यापक
एम.जी.एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, छ. संभाजीनगर

Web Title: Geranium offers a double benefit; How to cultivate as an aromatic and medicinal plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.