Join us

Spray Pump Subsidy : बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप घ्या आता अनुदानावर कुठे कराल अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 5:00 PM

Spray Pump Subsidy : ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’साठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर  तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. 

सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप या बाबीचा १०० टक्के अनुदानावर पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. ३१ ऑगस्ट २०२४  पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.  त्यामुळे अजून दोन दिवस शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. 

कृषी यांत्रिकीकरण या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या वेबसाईट वर जाऊन जास्तीत-जास्त ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

कसा कराल अर्ज१) अर्ज करणे साठी वेबसाईट https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login२) लाभार्थी (शेतकरी) “युजर आयडी व पासवर्ड” तयार करणे.३) लाभार्थी (शेतकरी) “युजर आयडी व पासवर्ड” टाकून लॉगीन करणे.४) अर्ज करा या बाबीवर क्लिक करणे.५) कृषी यांत्रिकीकरण बाबीवर क्लिक करणे.६) मुख्य घटक बाबीवर क्लिक करणे.७) तपशील बाबीवर क्लिक करून - मनुष्यचलित औजारे घटक निवड - यंत्र/औजारे व उपकरणे - पिक संरक्षण औजारे - बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन) बाब निवडणे८) जतन करणे.

अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी/उप विभागीय कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

टॅग्स :शेतकरीशेतीपीकसोयाबीनसरकारसरकारी योजनाकापूस