Join us

शेत शिवारात २०० ड्रोन घालणार घिरट्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2023 2:30 PM

विषबाधा रोखणार; नॅनो टेक्नॉलॉजीसाठी होणार वापर

शेतात खताच्या नॅनो टेक्नॉलॉजीच्या वापरासह फवारणीमधील विषबाधा रोखण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी शासकीय खत कंपनी राज्यभरात २०० ड्रोन मशिन पुरविणार आहे.

या माध्यमातून ४० लाख एकरवर फवारणी केली जाणार आहे. राज्यात या प्रयोगासाठी इफको ही शासकीय कंपनी पुढे आली आहे. नॅनो युरिया, नॅनो डीएपी खताची माहिती देण्यासह ड्रोनच्या माध्यमातून शेत शिवारात फवारणी करण्याचे नवे तंत्रज्ञान रुजविले जाणार आहे. यासाठी इफको खत कंपनी २०० ड्रोन पुरविणार आहे.

यातील आठ ड्रोन यवतमाळला मिळणार आहेत. खत कंपनीसह कृषी विभागाच्या माध्यमातूनही ड्रोनच्या फवारणीची योजना हाती घेतली जाणार आहे. खत कंपनीसह कृषी विभागाच्या माध्यमातूनही ड्रोनच्या फवारण्याची योजना हाती घेतली जाणार आहे.

जबाबदारी सुशिक्षित बेरोजगारांवर

ड्रोन चालविण्याची जबाबदारी सुशिक्षित बेरोजगारांवर सोपविली जाईल. युवकांची कंपनी स्तरावरून निवड होणार असून, १० लाख रुपये किमतीचा ड्रोन आणि पाच लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिक बाइक युवकाच्या स्वाधीन केली जाईल. हा ड्रोन दर दिवसाला ५० ते १०० एकर फवारणी करणार आहे. पाच वर्षात ड्रोनच्या माध्यमातून किमान २० हजार एकर क्षेत्रावर फवारणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. यातून सुशिक्षित बेरोजगाराला रोजगारही मिळणार आहे.

१५ मिनिटांत होणार चार्ज

ड्रोन इलेक्ट्रिक चार्जिंगवर उडविला जाणार आहे. ही बॅटरी १५ मिनिटांत चार्ज होणार आहे. स्थानिक पातळीवरील फवारणीच्या दराच्याही कमी दरात या ड्रोनने फवारणी होईल.

टॅग्स :शेती क्षेत्रतंत्रज्ञानशेतकरीपीकखतेयवतमाळशेती