महाराष्ट्रात प्रामुख्याने आल्याच्या माहीम या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाणाची लागवड केली जाते. याशिवाय रियो दि जेनेरो, चिनी, जमैका, जपानी, कोचीन, सुरुची, सुरभी, सुप्रभात, वासयनाड, मारन या सुधारित जाती आहेत.
पूर्वतयारी- हेक्टरी १५०० ते १८०० किलो बेणे लागते.- जमीन १५ ते २० सेंटीमीटर खोल नांगरून, ढेकळे फोडून भुसभुशीत करावी.- जमीन तयार करताना शेणखत किंवा कंपोस्ट खत २५ ते ३० टन प्रति हेक्टरी द्यावे.
कंद निवड- सुधारित पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी १० ते १५ टन उत्पादन मिळते.- शेतात मूळ कुजव्या रोग असेल अशा शेतातील कंद लागवडीसाठी वापरू नयेत.- आल्याची लागवड फुगलेल्या डोळ्यांच्या बोटांपासून करतात.- अंदाजे २५ ते ३० ग्रॅम वजनाचे बोट (तुकडे/कुडी) रोगविरहित साठवणीतून काढलेले लागवडीसाठी वापरतात. त्यावर १ ते २ रसरशीत डोळे असावेत.
लागवड - आल्याची लागवड सपाट वाफ्यावर, रुंद वरंबा पद्धत किंवा सरी पद्धतीने करतात.- मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड केल्यास उत्पादनात वाढ होते.- जमीन हलकी असल्यास तीन बाय २ मीटरचे सपाट वाफे करावेत.- मध्यम व भारी जमिनीत सरी वरंबे तयार करावेत.- वरंबे तयार करताना दोन वरंब्यामधील अंतर ६० सेंटीमीटर ठेवावे. २० सेंटीमीटर उंचीचे व तीन मीटर लांबीचे व एक मीटर रुंदीचे गादी वाफे करावेत.
खत व्यवस्थापन- अधिक उत्पादनासाठी हेक्टरी २५ ते ३० टन कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी द्यावे.- आल्याच्या पिकाला हेक्टरी ७५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश प्रति हेक्टरी रासायनिक खताच्या स्वरूपात द्यावे.- आल्याची लागवड करताना नत्राचा निम्मा हप्ता म्हणजेच ३७.५ किलो, ५० किलो स्फुरद व २५ किलो पालाश जमिनीत मिसळावे.- लागवडीनंतर ४० दिवसांनी निम्मे नत्र म्हणजेच ३७.५ किलो प्रति हेक्टरी द्यावे.- या नत्राच्या हप्त्यानंतर ३० दिवसांनी तणाचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
पाणी व्यवस्थापन व पिक संरक्षण- आले लागवड केल्यानंतर पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.- पावसाळा संपल्यानंतर ६ ते ८ दिवसांनी पाणी दिले पाहिजे.- जमिनीत पाणी साचल्याने मूळ कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होतो.- रोगग्रस्त आले दिसताच काढून नष्ट करावे.- कंदमाशीच्या नियंत्रणासाठी लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.- निरोगी कंदाची लागवड करावी.
काढणी व उत्पादन- ओल्या आल्यासाठी लागवडीनंतर ६ ते ८ महिन्यांनी पाने पिवळी पडल्यानंतर किंवा वाळल्यानंतर पीक काढणीसाठी तयार होते.- सुंठ करण्यासाठी पाला वाळून खाली पडल्यावर म्हणजे २१० ते २२० दिवसांनी काढणी करावी.
अधिक वाचा: Parasbag : शेतकऱ्यांनो तुमच्या आरोग्याची पण घ्या काळजी तयार करा अशी पोषणबाग