Join us

पशुपालकांसाठी सुवर्ण संधी, 75 टक्के अनुदानावर विविध योजना 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 12:58 PM

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून पशू पालकांसाठी महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून पशू पालकांसाठी महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. नाशिक जिल्हा पशू संवर्धन विभागाकडून पशू विषयक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. यात वेगवगेळ्या योजना ज्या शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय म्ह्णून उभारू शकतात. जेणेकरून शेतीला हातभार लावता येणार आहेत. पाहुयात काही योजनांची माहिती. 

कृषी पशु संवर्धक विभागाकडून पशु पालकांसाठी सुवर्णसंधी असून वेगवगेळ्या योजना राबविण्यात येत आहेत. यात राजस्तरीय आणि जिल्हास्तरीय असे स्वरूप आहे. तर नाशिक (Nashik) पशुसवंर्धन विभाग जिल्हापरिषद व राज्यशासन यांचे मार्फत पशुपालकांना अनु. जातीसाठी अनु. जमाती साठी व सर्वसाधारण पशुपालकांसाठी ऑनलाईन अर्ज 15 डिसेंबरपर्यंत या कालावधीत स्वीकारण्यात येत होते. परंतु जिल्हा स्तरीय योजना अंतर्गत खालील योजनांचे समाधानकारक अर्ज संख्या प्राप्त न झाल्याने ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 18 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तरी जिल्हयातील अनु जाती, अनु. जमाती व सर्वसाधारण पशुपालक यांनी खालील योजनांमध्ये अर्ज भरुन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

तसेच राज्य स्तरीय योजनामध्येही 10+1 शेळीगट, दुधाळ जनावरांचा गट वाटप व 1000 मांसल कुक्कुट पक्षीगृह बांधकाम या योजनासाठी अर्ज करता येइल.ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन पशु संवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. तर मोबाईल व्दारे अर्ज करण्यासठी AIH.MAHABMS या अँपवर जाऊनही अर्ज करता येणार आहे. पशु संवर्धन विभागातील सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

अशा आहेत योजना 

योजनेचे नाव

10+1 शेळीगट ही योजना अनुसूचित जाती जमातीसाठी आहे. तसेच अनुदानाची टक्केवारी 75 टक्के असून म्हणजेच 77 हजार 569 इतकी रक्कम असून २५ टक्के रक्कम लाभार्थ्याला भरावयाची आहेत. या योजनेसाठी लाभधारक बीपीएल, बचत गट, अल्प भूधारक असायला हवा. लाभधारक तीन अपत्ये असणारा नको. यानंतर लाभार्थ्यांची यादी तयार करून योजना राबवली जाईल. ज्यांची नाव यादीत असूनही लाभ मिळाला नाही, अशा लाभधारकांना प्रतीक्षा यादीत ठेऊन पुढील वर्षी लाभासाठी प्राधान्य दिले जाईल. 

दुसरी योजना 2 दुधाळ जनावरांचा गट ही योजना देखील अनुसूचित जाती जमातीसाठी आहे. तसेच ही योजना देखील 75 टक्के अनुदान शासनाकडून तर 25 टक्के अनुदान लाभार्थ्यांना द्यावे लागते. यात गायगटासाठी 1 लाख 17 हजार 638 रुपये एकूण रक्कम आहे. तसेच म्हैसगटासाठी 1 लाख 34 हजार 443 रुपये इतकी रक्कम आहे. तसेच 10+1 शेळी गट ही योजना अनुसूचित जमातीसाठी आहे. या योजनेतही 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. 77 हजार 569 रुपये अशी एकूण अनुदानाची रक्कम असणार आहे. चौथी योजना 100 एकदिवसीय कुक्कुट गट वाटप हि योजना असून ही सर्व प्रवर्गासाठी आहे. यासाठी 50 टक्के अनुदान असून 50 टक्के अनुदान लाभार्थ्याला देणं आहे. यात दुसरी योजना 25+3 तलंगा गट वाटपाची आहे. यासाठी देखील 50 टक्के अनुदान आहे. या सर्व योजनासाठी जातीचा दाखला, आधार कार्ड,  रेशन कार्ड, फोटो, जनावरांना जागा उपलब्ध असणे आवश्यक, स्वतःची जागा असेल तर नमुना नंबर 8 आवश्यक आहे. 

 

टॅग्स :शेतीनाशिकगाय