Lokmat Agro >स्मार्ट शेती > एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षणांची सुवर्णसंधी.. वाचा सविस्तर

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षणांची सुवर्णसंधी.. वाचा सविस्तर

Golden opportunity of various trainings for farmers under Integrated Horticulture Development Mission.. Read in detail | एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षणांची सुवर्णसंधी.. वाचा सविस्तर

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षणांची सुवर्णसंधी.. वाचा सविस्तर

फलोत्पादन पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने अवलंब करण्यासाठी तसेच, उत्पादनांचे काढणीत्तोर व्यवस्थापन, निर्यातीला चालना देणे या उद्देशाने अशी प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात.

फलोत्पादन पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने अवलंब करण्यासाठी तसेच, उत्पादनांचे काढणीत्तोर व्यवस्थापन, निर्यातीला चालना देणे या उद्देशाने अशी प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात.

शेअर :

Join us
Join usNext

प्रशिक्षण हा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा अविभाज्य घटक आहेत. या कार्यक्रमांतर्गत शेतकरी, क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येतात.

फलोत्पादन पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने अवलंब करण्यासाठी तसेच, उत्पादनांचे काढणीत्तोर व्यवस्थापन, निर्यातीला चालना देणे या उद्देशाने अशी प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात.

त्याचप्रमाणे प्रशिक्षण प्रभावी होण्यासाठी यामध्ये प्रात्यक्षिकांचे आयोजन तसेच, यशस्वी व प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रांना भेटी दिल्या जातात.

सन २०१४-१५ च्या निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२४-२५ या वर्षाकरीता मनुष्यबळ विकास घटकांतर्गत राज्यामध्ये संस्थानिहाय शेतकरी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

याकरीता, रक्कम रू. ५६.०० लाख रकमेचा कार्यक्रम मंजुर असुन त्याअंतर्गत खालीलप्रमाणे संस्थेमार्फत विभागनिहाय शेतकरी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अ.क्रसंस्थेचे नांवविभागनिहाय कार्यक्रम
राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था, एनआयपीएचटी, तळेगाव दाभाडे. ता. मावळ जि. पुणेठाणे, पुणे व कोल्हापुर व अमरावती विभाग
कृषि विज्ञान केंद्र, बारामती जि. पुणेनाशिक, छ. संभाजीनगर, लातुर व नागपुर विभाग
राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (NHRDF), चितगाव फाटा, दारणा. ता. निफाड, जि. नाशिकनाशिक विभाग
आनंदनिकेतन कृषी महाविद्यालय वरोरा, जि. चंद्रपुरनागपुर विभाग
हापुस आंबा गुणवत्ता केंद्र, दापोलीठाणे विभाग
डाळिंब गुणवत्ता केंद्र, राहुरीपुणे विभाग
केशर आंबा गुणवत्ता केंद्र, छ. संभाजीनगरछ. संभाजीनगर विभाग
संत्रा गुणवत्ता केंद्र, नागुपरनागपुर व अमरावती विभाग

प्रशिक्षणामध्ये खालीलप्रमाणे फलोत्पादन व अनुषंगीक विषयावर प्रशिक्षण देणेबाबत नियोजन आहे.
• फळे व भाजीपाला रोपवाटीका.
• कृषि व्यापाराबाबत धोरण व निर्यातीबाबत माहिती.
• जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन (आंबा, चिक्कु, संत्रा व मोसंबी)
• ड्रॅगनफ्रूट व जिरेंनियम य नाविण्यपुर्ण पिकांचे उत्पादनाचे तंत्रज्ञान
• औषधी, सुगंधी व मसाला पिकांचे उत्पादन, प्रक्रिया व विपणन.
• हरितगृह/पॉलीहाऊस व्यवस्थापन.
• हॉर्टीकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स.
• काढणीपश्चात व्यवस्थापन (फळे व भाजीपाला)
पीकनिहाय लागवड व प्रक्रिया (डाळींब, हळद व आले)

मनुष्यबळ विकास कार्यक्रम या घटकाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे रक्कम रु. १००० प्रति प्रशिक्षणार्थी प्रती दिवस या प्रमाणे मापदंड अनुज्ञेय असुन ३ ते ५ दिवसांचे निवासी प्रशिक्षण घेण्यात येते.

यामध्ये, प्रशिक्षण साहित्य, चहा पान, भोजन व निवास व्यवस्था इ. ची सुविधा आहे. तरी, इच्छुक शेतकऱ्यांनी प्रशिक्षणासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या संस्थांना तसेच, अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

अ.क्रसंस्थेचे नांवविभागनिहाय संपर्क
राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था, एनआयपीएचटी, तळेगाव दाभाडे. ता. मावळ जि. पुणेश्री. विश्वास जाणव ०२११-४२२३९८०/९४२३०८५८९४
कृषि विज्ञान केंद्र, बारामती जि. पुणेश्री. यशवंतराव जगदाळे ०२११-२२५५२२७/९६२३३८४२८७
राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (NHRDF), चितगाव फाटा, दारणा. ता. निफाड, जि. नाशिकडॉ. पी.के. गुप्ता ९४२२४९७७६४
आनंदनिकेतन कृषी महाविद्यालय वरोरा, जि. चंद्रपुरडॉ. अनिल भोगावे ९५७९३१३१७९
हापुस आंबा गुणवत्ता केंद्र, दापोलीडॉ. महेश कुलकर्णी ८२७५३९२३१५
डाळिंब गुणवत्ता केंद्र, राहुरीडॉ. सुभाष गायकवाड ९८२२३१६१०९
केशर आंबा गुणवत्ता केंद्र, छ. संभाजीनगरडॉ. जी. एम. वाघमारे ७५८८५३७६९६
संत्रा गुणवत्ता केंद्र, नागुपरडॉ. विनोद राऊत ९९७००७०९४६

Web Title: Golden opportunity of various trainings for farmers under Integrated Horticulture Development Mission.. Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.