Join us

बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, यासाठीही मिळणार अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 6:24 PM

बांबू लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

अटल बांबू समृद्धी योजनेत शेतकऱ्यांना उती संवर्धित (टिश्यू कल्चर) बांबू रोपे पुरवठा व देखभालीसाठी अनुदान देण्याचा निर्णय नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. .

पुर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेत शेतकऱ्यांना बांबू रोपे पुरवठा करण्याचा तरतूद होती. या योजनेत सुधारणा होऊन आता शेतकऱ्यांना बांबूच्या देखभालीसाठी देखील अनुदान मिळणार आहे.आता २ हेक्टर करिता बाराशे रोपांची लागवड व देखभालीसाठी प्रति रोप १७५ रुपये अनुदान तीन वर्षांत देण्यात येईल. जुन्या योजनेत एक हेक्टरसाठी सहाशे रोपे देण्याची तरतूद होती. शेतकऱ्याला बांबू रोपांच्या बरोबरच निंदनी, पाणी देणे, संरक्षण व खते यासाठी देखील अनुदान मिळणार असल्यामुळे बांबू लागवडीत वाढ होऊन, शेतकऱ्याला लाभ होईल.

टॅग्स :सरकारी योजनाशेतकरीपीक व्यवस्थापन