संगणक, टीव्ही, फ्रीज अशी एकही वस्तू नाही, ज्यात इलेक्ट्रॉनिक्सचा वापर करण्यात आलेला नाही. आता मात्र शास्त्रज्ञांनी चक्क विद्युत वाहक 'इलेक्ट्रॉनिक माती' (ई-सॉइल) विकसित केली आहे, जी १५ दिवसांत जवस (बार्ली) रोपांची सरासरी ५० टक्के अतिरिक्त वाढ करू शकते. हायड्रोपोनिक लागवडीसाठी विद्युत प्रवाहकीय लागवड सब्सट्रेट विकसित केला, ज्याला ते 'ई-सॉइल' म्हणतात. त्यात वीज प्रवाहित करून जवस अंकुरित केले जातात.
'इलेक्ट्रॉनिक माती'चे फायदे
- ही एक बंदिस्त प्रणाली आहे. ज्यात पाणी असे प्रवाहित केले जाते, जेणेकरून प्रत्येक रोपाला आवश्यक असलेले पोषक घटक मिळतील. त्यामुळे फार कमी पाण्याची गरज भासते, जे पारंपरिक शेतीमध्ये शक्य नाही.
- हायड्रोपोनिक्समुळे जागेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मोठ्या टॉवरमध्ये उभी लागवड करणे शक्य होते. या पद्धतीने आधीच लागवड केलेल्या पिकांमध्ये लेट्यूस, औषधी वनस्पती आणि काही भाज्या यांचा समावेश होतो.
जगातील लोकसंख्या वाढत आहे आणि हवामानातील बदलदेखील वाढत आहेत. त्यामुळे अन्नाची मागणी पारंपरिक शेती कृषी पद्धतींनी पूर्ण होऊ शकणार नाही; परंतु हायड्रोपोनिक्सच्या साह्याने शहरी वातावरणातही अतिशय नियंत्रित जागेत पीक घेता येईल. - एलेनी स्टॅव्हिनिडो, संशोधक, लिकोपिग विद्यापीठ