हवामान बदल, कधी अतिरेकी पाऊस तर कधी दुष्काळ,अशा वेगवेगळ्या कारणांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. भारतातील शेतकऱ्यांना पारंपारिक शेतीबरोबरच कृषी आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शासन अर्थसहाय्य करते. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी महाराष्ट्र सरकारची मधुमक्षिका पालन अनुदान योजना अर्थसहाय्य करते.
नुकतेच कोल्हापुरातील मधाचे गाव अशी ओळख असणाऱ्या पाटगाव नावाच्या गावाला राष्ट्रीय ग्रामीण पर्यटन पुरस्कार मिळाला आहे. मधमाशांचे पालन व्यवस्थित केले व त्यापासून मिळणाऱ्या मध विकला तर एक एकर शेतात ठेवलेल्या मधमाशांच्या पेट्यातून ५० ते ६० हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळू शकते. केवळ मधातून नव्हे तर मधमाशांचे मेन हे सौंदर्यप्रसाधन व औद्योगिक उत्पादनाचा घटक देखील आहे, तसेच औषधे गुणधर्मांसाठी ही मध ओळखला जात असल्याने मधाची बाजारपेठ मोठी आहे.
संबंधित वृत्त : https://www.lokmat.com/agriculture/success-story/journey-from-patgaon-honey-village-to-one-of-the-best-tourist-villages-in-the-country-a-a975/
मधुमक्षिका पालन योजनेअंतर्गत कोणाला मिळतो लाभ?
राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या मधुमक्षिका पालन योजनेअंतर्गत भूमिहीन व्यक्ती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, यामधील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दिव्यांग महिला तसेच सर्वसाधारण शेतकरी यांना प्राधान्य दिले जाते.
किती मिळते अर्थसहाय्य?
मधुमक्षिका पालन योजनेअंतर्गत लाभार्थ्याला ८ हजार ते ४० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. मधुमक्षिका संचावर ही रक्कम अवलंबून आहे. जास्तीत जास्त ५० मधुमक्षिका संच, स्टॅंडर्ड मधुमक्षिका पेटी व मध काढणी यंत्र, फूड ग्रेड मध कंटेनर खरेदीसाठी हे अनुदान आहे.
कसा व कुठे कराल अर्ज?
- मधुमक्षिका पालन योजना अंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे करावी.
- यासाठी महापौखराच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी अर्ज करून आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे
- यानंतर निवडलेल्या लाभार्थ्याने खरेदी समितीच्या उपस्थित मधुमक्षिका वसाहत संच व मध काढणी यंत्र इत्यादी यंत्रांची खरेदी करणे अनिवार्य आहे
- पूर्वसंमती मिळाल्यापासून मधुमक्षिका संशोधन व इतर आवश्यक बाबींची खरेदी एक महिन्याच्या आत करून ऑनलाईन अनुदान मागणी करावी
भारत जगातील प्रमुख मध निर्यातदार
जगभरातील प्रमुख मध निर्यात करणाऱ्या देशांपैकी भारत हा प्रमुख देश आहे. भारत सुमारे 83 देशांमध्ये मध निर्यात करतो. भारतीय मधाची प्रमुख बाजारपेठ अमेरिका, सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश, कॅनडा इत्यादी देश आहेत.
कोणता मध भारतातून निर्यात केला जातो?
मोहरी मध, निलगिरी मध, लिची मध, सूर्यफूल मध, पोंगमिया मध, बहु वनस्पती हिमालयीन मध, बाभूळ मध इत्यादी मधाच्या काही प्रमुख जाती भारतातून निर्यात केल्या जातात.