Join us

औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन यासाठी संशोधन केंद्र, विद्यापीठे व एनजीओंना मिळणार अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 9:17 AM

केंद्र पुरस्कृत योजना-औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन या योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

केंद्र पुरस्कृत योजना-औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन या योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. सदर योजना हि प्रकल्प आधारित असून या योजनेअंतर्गत विविध घटकांचे प्रकल्प प्रस्ताव मागवून घेणे करिता संशोधन केंद्र, विद्यापीठे, NGO यांना आवाहन करण्यात येत आहे.

राज्यामध्ये राष्ट्रीय वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांचे मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र पुरस्कृत योजना-औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन ही योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत दर्जेदार लागवड साहित्य, IEC उपक्रम,काढणीपश्चात व्यवस्थापन आणि विपणनासाठी पायाभूत सुविधा, गुणवत्ता चाचणी आणि प्रमाणन या घटकांचा समावेश होतो.

योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये “Forward and backward linkage in supply chain of medicinal plants (Integrated component)” हा घटक समाविष्ट केलेला आहे. योजनेचा कालावधी २२ जून २०२३ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत आहे.

औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन अंतर्गत विविध घटकांकरीता देय अनुदान खालीलप्रमाणे

अ.क्र

बाब

मापदंड

देय अनुदान

दर्जेदार लागवड साहित्यासाठी पायाभूत सुविधा (लागवड साहित्याचे उत्पादन)

 

अ. सार्वजनिक क्षेत्र

 

 

 

१) बियाने/ जनुक केंद्रांची स्थापना (४ हे.)

रु.२५ लक्ष

कमाल रु.२५ लक्ष

 

२) आदर्श रोपवाटिका (४ हे.)

रु.२५ लक्ष

कमाल रु.२५ लक्ष

 

३) लहान रोपवाटिका (१ हे.)

रु.६.२५ लक्ष

कमाल रु.६.२५ लक्ष

 

ब. खाजगी क्षेत्र

 

 

 

१) बियाने/ जनुक केंद्रांची स्थापना (४ हे.)

रु.२५ लक्ष

प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के कमाल रु.१२.५० लक्ष

 

२) आदर्श रोपवाटिका (४ हे.)

रु.२५ लक्ष

प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के कमाल रु.१२.५० लक्ष

 

३) लहान रोपवाटिका (१ हे.)

रु.६.२५ लक्ष

प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के कमाल रु.३.१२५ लक्ष

माहिती, शिक्षण आणि संप्रेषण

 

१) शेतकऱ्यांचे प्रशिक्षण (किमान दोन दिवसांसाठी)

 

रु.२,०००/-प्रती प्रशिक्षणार्थी  राज्यातील व रु.५,०००/- प्रती प्रशिक्षणार्थी राज्याबाहेरील प्रशिक्षणासाठी तसेच वाहन खर्च वरील अनुदानात देय राहील

 

२) खरेदीदार-विक्रेता भेट

 

जिल्हा स्तरीय रु.१.०० लक्ष व राज्य स्तरीय रु.२.०० लक्ष

काढणीपश्चात व्यवस्थापन आणि विपणनासाठी पायाभूत सुविधा

 

वाळवणी गृह

रु.१० लक्ष

सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदार १००% अनुदान-सहाय्यासाठी पात्र असतील आणि खाजगी क्षेत्रातील अर्जदार ५०% अनुदान-सहाय्यासाठी पात्र असतील

 

मूल्यवर्धन पायाभूत सुविधा

रु.१५ लक्ष

सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदार १००% अनुदान-सहाय्यासाठी पात्र असतील आणि खाजगी क्षेत्रातील अर्जदार ५०% अनुदान-सहाय्यासाठी पात्र असतील

 

ग्रामीण संकलन केंद्र

रु.२० लक्ष

सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदार १००% अनुदान-सहाय्यासाठी पात्र असतील आणि खाजगी क्षेत्रातील अर्जदार ५०% अनुदान-सहाय्यासाठी पात्र असतील

गुणवत्ता चाचणी

 

उत्पादकांना चाचणी शुल्काच्या ५०%, जास्तीत जास्त रु. ५,०००/- पर्यंत राहतील (आयुष/एनएबीएल मध्ये औषधी वनस्पती/औषधी वनस्पतींची चाचणी घेतल्यास)

प्रमाणन

 

प्रमाणन शुल्क रु.५.०० लक्ष च्या मर्यादेत गट/क्लस्टर आधारीत (गट/क्लस्टरमध्ये ५० हेक्टर लागवडीसाठी)

योजनेच्या मार्गदर्शक सूचना राष्ट्रीय वनस्पती मंडळ, नवी दिल्ली (NMPB)च्या https:// nmpb.nic.in या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.

संशोधन केंद्र, विद्यापीठे, NGO यांना आवाहन करण्यात येते कि, सदर योजना हि प्रकल्प आधारित असून या योजनेअंतर्गत औषधी वनस्पतींच्या विविध घटकांचे प्रकल्प प्रस्ताव मार्गदर्शक सूचनेतील प्रपात्रानुसार राष्ट्रीय वनस्पती मंडळ (NMPB), नवी दिल्ली यांना सादर करणेकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फत पडताळणी करून शिफारशीसह परिपूर्ण प्रकल्प प्रस्ताव राज्य औषधी वनस्पती मंडळ (SMPB), पुणे यांच्याकडे सादर करण्यात यावेत.

टॅग्स :केंद्र सरकारसरकारी योजनासरकारराज्य सरकारशेतीकृषी विज्ञान केंद्रविद्यापीठ