Lokmat Agro >स्मार्ट शेती > Grape Grafting द्राक्षात खुंट रोपावर कसे केले जाते कलम

Grape Grafting द्राक्षात खुंट रोपावर कसे केले जाते कलम

Grape Grafting: How to grafting is done on a grape rootstock | Grape Grafting द्राक्षात खुंट रोपावर कसे केले जाते कलम

Grape Grafting द्राक्षात खुंट रोपावर कसे केले जाते कलम

द्राक्षवेलीचे आयुष्यमान हे लागवडीनंतर १२-१४ वर्षे असल्यामुळे सुरवातीसच काळजी घेणे गरजेचे असते. कलम हे खूप काळजीपूर्वक करणे जरुरीचे असते

द्राक्षवेलीचे आयुष्यमान हे लागवडीनंतर १२-१४ वर्षे असल्यामुळे सुरवातीसच काळजी घेणे गरजेचे असते. कलम हे खूप काळजीपूर्वक करणे जरुरीचे असते

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्र राज्यात द्राक्षपीक हे अती महत्वाचे फळपीक समजले जाते. राज्यात या पीकाचे क्षेत्र नाशिक, सोलापूर, सांगली, पुणे व विदर्भाच्या काही भागात प्रामुख्याने आहे.

द्राक्ष लागवडीखाली क्षेत्र वाढत असले तरी, लागवडी संदर्भात काही त्रुटी तशाच राहतात. द्राक्षवेलीचे आयुष्यमान हे लागवडीनंतर १२-१४ वर्षे असल्यामुळे सुरवातीसच काळजी घेणे गरजेचे असते.

कलम करण्याकरीता द्राक्ष जाती
■ हिरव्या रंगाचा गोल जाती
थॉमसन सीडलेस, तास अ-गणेश, मांजरी, क्लोन २५, नवीन, मांजरी किशमिश इ.
■ हिरव्या रंगाच्या लांब मन्याच्या जाती
सोनाका, सुपर सोनाका, माणिक चमन, एस एस एन आर के सिडलेस, अनुष्का, वनाका इ.
■ रंगीत गोल जाती
रेड ग्लोब, क्रिसमस सिडलेस, फॅन्टासी सिडलेस, मांजरी मेडिका, शरद सिडलेस, नानासाहेब पर्पल इ.
■ लांब मन्यांच्या रंगीत द्राक्ष जाती
सरिता सीडलेस, कृष्णा सिडलेस, ज्योती सीडलेस इ.

कलम कसे करावे?
- कलम हे खुंटकाडीवर जमीनीपासून सव्वा ते दिड फुटावर ८ ते १० मि.मी. जाडीच्या काडीवर केले जाते.
- तेव्हा ही जाडी मिळण्याकरीता खुंटकाडीच्या बगलफुटी टप्प्या टप्प्यात कमी कराव्यात.
- वातावरणात जेव्हा जास्त तापमान (३०-३५ सें.ग्रे.) व आर्द्रता ८०% च्या पुढे असते अशावेळी कलम यशस्वी होते.
- ही परिस्थिती ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अनुभवास येते.

कलम यशस्वी होण्याकरीता खालील उपाययोजना कराव्यात
१) निवडलेली सायन काडी ही भरपूर उत्पादन देणाऱ्या सशक्त, रोग व किडमुक्त वेलीपासून असावी.
२) निवडलेली सायन काडी ही परिपक्व असावी तसेच खुंटकाडीसुध्दा रसरशीत असावी.
३) निवडलेली काडी ही कलम करण्यापूर्वी १-२ तास कार्बेन्डाझीमच्या द्रावणात बुडवलेली असावी.
४) कलम करतेवेळी सायन काडीला २ इंच तिरका काप घ्यावा.
५) कलम जोड २०० मायक्रॉनच्या जाडीचे प्लॅस्टिक वापरून घट्ट बांधावा.

कलम केल्यानंतर १०-१२ दिवसानंतर डोळे फुटण्यास सुरवात होते व कलम जोड ४५ दिवसात भरून येतो. जसजसा कलम जोड फुगतो तसतशी प्लॅस्टिकची पट्टी त्यामध्ये अडकते. कालातंराने मोठी खाच त्यामध्ये पडुन कलम केलेली वेल वाया जाऊ शकते. तेव्हा ३० दिवसानंतर ती पट्टी कापून पुन्हा बांधावी.

नविन फूट ही पावसाळी वातावरणात येत असल्यामुळे त्यावर विविध प्रकारच्या रोग व किडीचा प्रादुर्भाव दिसतो. तेव्हा, प्रभावी उपाययोजना कराव्यात. कलम पुर्णपणे यशस्वी होण्याकरीता कलम जोडाच्या खाली निघालेल्या फूटी वेळोवेळी काढून टाकाव्यात.

अधिक वाचा: माती व पाण्याच्या परिस्थितीनुसार द्राक्ष बागेसाठी खुंटांची निवड कशी करावी?

Web Title: Grape Grafting: How to grafting is done on a grape rootstock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.