Join us

Guti Kalam : डाळिंब व पेरू फळझाडांमध्ये गुटी कलम कसे करावे वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 10:50 AM

फळझाडांची अभिवृद्धी बियाणांपासून केल्यास अशी झाडे उंच वाढतात व फळे धरण्यास अधिक कालावधी लागतो. तसेच त्यापासून मातृवृक्षासारखी चांगली फळे व उत्पन्न मिळत नाही.

फळझाडांची अभिवृद्धी बियाणांपासून केल्यास अशी झाडे उंच वाढतात व फळे धरण्यास अधिक कालावधी लागतो. तसेच त्यापासून मातृवृक्षासारखी चांगली फळे व उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे औषध फवारणी, छाटणी, फळांची काढणी इत्यादी कामे खर्चिक व त्रासदायक होतात.

त्यामुळे फळझाडांची लागवड कलमे लावून करतात. तथापि, नवीन संकरित जाती निर्माण करण्यासाठी, कलमांचे खुंट तयार करण्यासाठी व एकदल पिकांच्या (उदा. नारळ, सुपारी इत्यादी) अभिवृद्धीसाठी बियांचा वापर आवश्यक ठरतो.

कलमे तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत त्यात आपण गुटी कलम Air Layering असे केले जाते ते पाहणार आहोत.

गुटी कलम करण्याची पद्धती१) या पद्धतीमध्ये पेरू, डाळिंब, जाम, चेरी, दालचिनी इत्यादी फळझाडांची अभिवृद्धी केली जाते.२) यासाठी ४० ते ५० सेंटीमीटर लांब वाढलेल्या फांदीवर टोकापासून ३० ते ४० सेंटीमीटर अंतरावर १.५ सेंटीमीटर रुंदीची पूर्ण साल काढून घ्यावी.३) त्यानंतर तेथे ओले शेवाळ लावावे आणि ते प्लॅस्टिक कापडाने गुंडाळून दोन्ही टोकाकडे सुतळीने बांधून घ्यावे.४) पावसाळ्यात गुट्या चांगल्या प्रकारे होतात.५) सुमारे अडीच ते तीन महिन्यात या गुट्यांमधून मुळे बाहेर दिसू लागतात.६) तेव्हा गुट्या झाडापासून कापून प्लॅस्टिक पिशव्यात लावून सावलीत ठेवाव्यात.७) नंतर गुटीवरील ५० टक्के पाने कमी करावीत.८) या पद्धतीत ७० ते ८० टक्के यश मिळते.९) लवकर व अधिक प्रमाणात मुळ्या फुटण्यासाठी आयबीए किंवा एनएए ही संजीवकांचा वापर करावा.

अधिक वाचा: डाळिंब बागेत लवकर व मोठ्या प्रमाणात फुलधारणा होण्यासाठी सोपे उपाय

टॅग्स :फलोत्पादनफळेडाळिंबपीक व्यवस्थापन