Lokmat Agro >स्मार्ट शेती > Harbhara Bhaji : हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर ठेवते अनेक आजारांपासून दूर वाचा सविस्तर

Harbhara Bhaji : हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर ठेवते अनेक आजारांपासून दूर वाचा सविस्तर

Harbhara Bhaji : chick pea vegetable is very healthy keeps away from many diseases | Harbhara Bhaji : हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर ठेवते अनेक आजारांपासून दूर वाचा सविस्तर

Harbhara Bhaji : हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर ठेवते अनेक आजारांपासून दूर वाचा सविस्तर

harbhara gholna बाजारात हिवाळ्यातील हरभऱ्याची भाजी विक्रीस आली असून हिवाळ्यात थंडीची असल्याने अनेक खवय्ये हरभऱ्याची भाजी खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. हरभऱ्याचे पान तुरट, आंबट असते.

harbhara gholna बाजारात हिवाळ्यातील हरभऱ्याची भाजी विक्रीस आली असून हिवाळ्यात थंडीची असल्याने अनेक खवय्ये हरभऱ्याची भाजी खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. हरभऱ्याचे पान तुरट, आंबट असते.

शेअर :

Join us
Join usNext

बाजारात हिवाळ्यातील हरभऱ्याची भाजी विक्रीस आली असून हिवाळ्यात थंडीची असल्याने अनेक खवय्ये हरभऱ्याची भाजी खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. हरभऱ्याचे पान तुरट, आंबट असते.

थंडीत विशेषतः ही भाजी उपलब्ध होते. हरभऱ्याच्या पानाच्या हिरव्या भाजीला आपण इंग्रजीत चिकपी लिव्हज असे म्हणतो. या भाजीचा उल्लेख अनेक आयुर्वेद ग्रंथात जसे चरक संहिता, राज निघंटू, वाग्भट संहितामध्ये आढळतो.

हिवाळ्यात तापमानात घट होत असताना त्याचा शरीरावरही परिणाम होत असतो. हरभऱ्याच्या भाजीत हरभऱ्याच्या पानामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयर्न, झिंक मँगनीज, कॉपर आदी मॅक्रोन्यूट्रिएंट्स आढळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आरोग्यासाठी फायदेशीर
- या भाजीचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते जे हृदयाच्या आजाराचा बचाव करते.
- यामध्ये अधिक प्रमाणात पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
- तसेच कॉपर आणि झिंकमुळे त्वचेची चमक वाढते.
- भाजीतील आयर्न हे रक्ताच्या कमतरतेपासून बचाव करते.
- तसेच मधुमेहापासून ते त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी भाजी खूप फायदेशीर ठरते.

या भाजीत खूप अधिक प्रमाणात मिनरल्स आणि पॉवरफुल अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे अनेक आरोग्याच्या तक्रारींवर मात करता येते. भाजीत डाएटरी फायबर जास्त असल्यामुळे शरीरातील शुगर लेवल पटकन वाढ होत नाही. या कारणामुळे मधुमेहात याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. हरभऱ्याची भाजी मुगाच्या डाळीसोबत तयार करावी, जर कुणाला भाजीमुळे पित्त होत असेल तर पित्त होणार नाही. - डॉ. रुचिका परदेशी, आहारतज्ज्ञ

अधिक वाचा: हरभरा पिकात तुषार सिंचनाने पाणी देण्यामुळे कसे होतात फायदे वाचा सविस्तर

Web Title: Harbhara Bhaji : chick pea vegetable is very healthy keeps away from many diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.